Shevgaon : ढोरजळगांव येथे नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राचा शेतक-यांना दिलासा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव येथे नाफेडच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुळामाई अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी व महाएफपीसीच्या(Mahafpc) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या शासकीय हरभरा खरेदी केंन्द्रामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावर्षी उशिरा पाऊस झाल्याने हरभरा पिके जोमात आली होती. मात्र, शासकीय हमीभाव सुरू नसल्यामुळे      शेतक-याची हरभरा खरेदीत व्यापा-यांकडून मोठी लूट होत होती. मात्र, नाफेडच्या वतीने शासकीय हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र सुरू झाल्याने सध्या ४८७५ रूपये क्विंटल प्रमाणे ७५ टन हमीभावाने हरभरा खरेदी केला आहे.

कोरानोच्या पार्श्वभूमीवर नाफेडच्या वतीने दोन महिन्यापासून हरभरा खरेदी केंद्र सुरू असून त्यामुळे शेतक-यांच्या मालाला चांगला व योग्य भाव मिळत असल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी हरभरा नाफेड खरेदी केद्रांवर विक्रीसाठी आणावा, असे अवाहन मुळामाई अॅग्रोचे संचालक महादेव पाटेकर, आनंता ऊकिडे यांनी केले आहे.

महादेव पाटेकर (संचालक मुळामाई अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी)
ढोरजळगांवसह परीसरातील शेतकरी बांधवानी ३१ मे पर्यंत नांव नोंदणी करून नाफेड हरभरा केंद्रावर आधारभूत किंमतीत मालाच्या विक्रीचा लाभ घ्यावा. त्वरीत नोंदणी करुन हरभारा विक्रीसाठी आणण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here