Beed : मजुरांना आष्टी प्रशासनाकडून पुष्पगुच्छ देऊन निरोप 

मध्यप्रदेशातील बारा मजूर आष्टीतून गावी रवाना

कडा – मोलमजुरीसाठी तालुक्यात आल्यानंतर येथे अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील बारा मजुरांना प्रशासनाने आरोग्य तपासणी केल्यानंतर गावी जाण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर प्रशासनाकडून या मजुरांना पुष्पगुच्छ देऊन सामाजिक अंतराचे पालन करत एका खासगी बसद्वारे निरोप देण्यात आला.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या लॅकडाऊनमुळे तालुक्यात मोलमजुरीसाठी बाहेरील राज्यांतून आलेले अनेक मजूर अडकून पडले होते. या मजुरांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याची व्यवस्था प्रशासनाने केली असून या मजुरांची यादी करून ती जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविली आहे.

मध्यप्रदेशातून तालुक्यात मजुरीसाठी आलेल्या बारा मजुरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबाद येथून सोडण्यात येणा-या विशेष रेल्वेने या मजुरांना मध्यप्रदेशात त्यांच्या गावी मोफत पाठविले जाणार आहे. परवानगी दिलेल्या मजुरांना तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांच्यासह पोलिस अधिका-यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. खासगी बसद्वारे या मजुरांना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले असून तेथून रेल्वेने मजूर आपल्या मूळ गावी जाणार आहेत.

आष्टी – मध्यप्रदेश येथून मोलमजुरीसाठी तालुक्यात आलेल्या बारा मजुरांना प्रशासनातर्फे पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here