प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सोमवारी दुपारी तीन वाजता देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. कोरोनासंकट काळापासून ही पंतप्रधानांची पाचवी बैठक आहे. या बैठकीत लॉकडाऊनवर चर्चा होऊ शकते. तसेच कोरोनावरील वैक्सिन निर्मितीचे कार्य व संशोधन कुठपर्यंत आले आहे. याचाही आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.
यासोबतच या बैठकीत मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नावर मोठी चर्चा होणार आहे. स्थलांतरीत मजुरांमुळे कोरोना वेगाने पसरत आहे. यामुळे अनेक जिल्हे रेड झोनमध्ये आले आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट आणखी गडद होत चालले आहे. त्यामुळे मजुरांच्या विषयावर लॉक डाऊनमध्ये चर्चा होणार, अशी माहिती सुत्रांकडून समजत आहे.