Rahuri : Pune : लॉकडाऊनच्या काळातही एचआयव्ही बाधितांसाठी काम करणारा ‘विहान’ प्रकल्प प्रेरणादायी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहूरी : नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही या संस्थेअंतर्गत ‘विहान – काळजी आणि आधार’ हा प्रकल्प एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बांधवांसाठी कार्यरत आहे.

वायसीएम विहान पुणे सीएससी क्र. ३, पिंपरी-चिंचवड या एकट्या सीएससीमध्ये वायसीएम, औंध आणि बारामती या तीन एआरटी सेंटरचे मिळून जवळपास ८००० बाधित बांधव नोंदणीक्रृत आहेत. प्रत्येक महिन्याला ८००० च्या मागे एआरटीच्या गोळ्या न खाल्यामुळे मृत्यू येणाऱ्या बाधितांचा मृत्यूदर सरासरी १५ ते २० इतका आहे. प्रत्येक महिन्याला ७० ते १०० एचआयव्हीसह जगणारे नवीन लोकं नोंदणी करतात, अशी माहिती विहान पुणे सीएससी ३, पिंपरी-चिंचवडचे प्रकल्प समन्वयक प्रकाश मानव आणि समुपदेशक आशा घोडके यांनी दिली.

विशेष म्हणजे या प्रकल्पाचा समन्वयक प्रकाश मानव हा राहूरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील चिंचोली या गावचा असून लहानपणापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने विविध समाजबांधवांसाठी नेहमी अग्रेसर असतो. लॉकडाऊनच्या परिस्थितीत एचआयव्हीसह जगणाऱ्या लोकांना एआरटी सेंटरला गोळ्या घ्यायला जात असताना पोलीस मार देतील या भीतीने सीएससीचे ५०% पर्यंत लोकं औषधं चुकवायला लागले होते. त्यामुळे कोविड १९ च्या काळात एलएफयू आणि मृत्यूदर वाढेल, अशी साहजिक भीती राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि तत्सम संस्था या सर्वांनाच होती.

परंतु विहानच्या सर्व स्वयंसेवकांनी विशेषतः नीता बीरदवडे, प्रिन्सी कुमारी, रतन सांडभोर, सविता चांदगुडे, रमेश कदम, लता करवंदे, नंदा लंगोटे, संगीता भोर, सुनीता खराडे या योध्यांनी रात्रीचे दिवस करत एचआयव्हीसह जगणाऱ्या लोकांच्या अडचणी कशा सोडवता येतील यासाठी प्रयत्न केले. येत्या पुढील काळात लॉकडाऊन कधीपर्यंत वाढेल हे निश्चित नाही. परंतु आमचे हे योद्धे अशाच उर्मीने लढत राहतील असंही प्रकल्प समन्वयक यांनी सांगितलं आहे.
टीम एनएमपी प्लस, नॅको, एमसॅक्स, डापकु, एआरटी सेंटर्स, लिंक एआरटीसी, आयसीटीसी आणि विहान यांनी वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची मदत घेत आरोग्य यंत्रणेमार्फत औषधं अत्यंत गरजू बांधवांपर्यंत घरपोच पोहोचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत केले आणि बाधितांच्या औषधपुरवठ्यासाठी अहोरात्र झटत हे युद्ध लढले.

या लढ्यात, पुण्यातील विहान सीएससीने एनएमपी प्लस जनरल सेक्रेटरी मनोज परदेशी, प्रोजेक्ट डायरेक्टर विनोद जांभळे, प्रोग्राम ऑफिसर विजय भेंडे, एम अँड ई श्रीनाथ बेदरकर, डीपीओ प्रसाद सोनवणे तसेच वायसीएम, औंध आणि बारामती हॉस्पिटल येथील एआरटीसी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सीएससी आणि एआरटी सेंटर्स यांमध्ये समन्वय ठेवून ही कामगिरी अतिशय उल्लेखनीय प्रकारे पार पाडली.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here