National : नवी दिल्लीवरून मोजक्या स्थानांसाठी उद्यापासून रेल्वे सुरू; आयआरसीटीसीच्या साईटवरून टिकिट बुकिंग शुरू

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नवी दिल्ली : नवी दिल्लीवरून मोजक्या स्थानांसाठी उद्यापासून रेल्वे सुरू होत आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. 

देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांसाठी या रेलसेवा सुरू करण्यात येत आहे. या सर्व ट्रेन नवी दिल्लीवरून सुरू होणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून सोमवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून हे तिकिट बुकिंग सुरू होणार आहे. मात्र कोणत्याही स्टेशनवरून काऊंटर तिकिट बुकिंग होणार नाही. तसेच फक्त कन्फर्म तिकिट असलेलेच प्रवास करू शकतील.

रेल्वे मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे की सर्व यात्रेकरूंची स्क्रिनिंग होईन, तसेच त्यांना फेस मास्क लावने अनिवार्य करण्यात येणार आहे. ज्या यात्रेकरूंना ताप आहे, अशांना तिकिट असले तरी त्यांचे तिकिट रद्दबादल ठरेल.

नवी दिल्लीवरून या स्टेशनसाठी गाड्या सोडण्यात येणार आहे,
मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, डिब्रूगढ, अगरताला, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भूवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगांव, आणि जम्मू तवी या मार्गांना जोडणा-या ट्रेन सोडण्यात येणार आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here