Shrigonda : तोतया पोलिसांची गावठी हातभट्टीवर कारवाई, पाच हजार रुपये घेऊन फरार…

0

प्रतिनिधी | श्रीगोंदा

श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरांमध्ये दिनांक २५ एप्रिल (शनिवार) सकाळी साडेपाचच्या सुमारास, एका अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. तोंड बांधलेले दोन व्यक्ती नमूद ठिकाणी जात पोलीस असल्याचे सांगत दबंगगिरी करत, हातभट्टी चालकाच्या मुलाला काठीने मारल्याने, परिसरात दहशत निर्माण झाली. भेदरलेल्या त्या हातभट्टी चालकाने पाच हजार रुपये देत मुलाच्या बदलीवर भावाला कारवाईसाठी पुढे केले. पैसे मिळाल्याबरोबर ते दोन्ही पोलीस लगबगीने घटनास्थळावरून पसार झाले.

दोन आठवडे उलटूनही त्या हातभट्टी चालकाला स्थानिक पोलिसांनी कसल्याही कारवाई विषयी बोलावले नाही. तसेच कोणतेही समजपत्र किंवा नोटीस आली नाही. श्रीगोंदा पोलिसांना याविषयी विचारले असता, आम्ही कारवाई केलीच नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर, गेल्या पंधरवड्यात कारवाईच्या नावाखाली आलेले पोलीस नसून, तोतया पोलीस असल्याचा संशय यामुळे बळावला आहे. याप्रकरणी सविस्तर चौकशी केली असता, यात गोलमाल झाल्याचे समोर आले.

ही कारवाई पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नसल्याचे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून समजले आहे. म्हणजेच कोरोना आजाराचा फायदा उठवत तोंड बांधून पोलिसांच्या वेषात तोतया पोलिसांनी रेड टाकल्याचे समोर आले आहे. तसेच, श्रीगोंदा पोलिसांच्या तोंडातील कारवाई हिसकावून नेल्याने त्यांनीही ‘आ वासला’ आहे. कोरोना आजार प्रादुर्भावात तोंड बांधून कोणीही पोलीस होत, अशा डुप्लिकेट कारवाया करत असल्याचे, या प्रकरणावरून स्पष्ट होत असल्याने, सामान्यांनी यातून धडा घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here