Karjat : राशीन कुळधरण भागात अवकाळी गारपीट, शहरात विजेच्या गडगडाटासह पावसाची हजेरी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १०

कर्जत : कर्जत शहर आणि तालुक्यातील राशीन, कुळधरण भागात रविवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. राशीन आणि कुळधरण भागात गारांचा पाऊस झाला असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत कुठेही नुकसान झाली नसल्याची नोंद झाली नव्हती. 

रविवारी संध्याकाळी साडेचार-पाचच्या सुमारास राशीन, सोनाळवाडी, तोरकडवाडी यासह कुळधरण परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. या ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे नुकसान झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. यासह अचानक सुरू झालेल्या गारपिटीने पशुधनसाठी गंजी उभारलेल्या कडबा पिकाचे नुकसान झाले आहे. तर बच्चेकंपनीसह अनेकांनी गारा खाण्याचा मनमुराद आनंद ही लुटला.

अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली होती. कर्जत शहरात संध्याकाळी सातच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी दिली. काही काळ शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच संध्याकाळी उशिरापर्यंत कर्जत तालुक्यतील कोणत्याही गावात गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाली नसल्याची नोंद करण्यात आली नव्हती.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here