Newasa : पाण्याची उत्पादकता वाढविण्यात पाणी वापर संस्थांची भूमिका महत्त्वाची

जलसंपदाचे सहसचिव डॉ. संजय बेलसरे
 
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा – उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचे वितरण करणे,सध्या उपलब्ध असलेल्या वितरण व्यवस्थेचा परिपूर्ण वापर करणे यासाठी पाणी वापर संस्थांची चळवळ आहे.पाण्याचा कार्यक्षम वापर करून त्यातून उभे राहिलेल्या पिकातून शेतकऱ्यांना दोन पैसे कसे मिळतील याचा विचार करतांना पाण्याची उत्पादकता कशी वाढता येईल यात पाणी वापर संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची आहे असे मत जलसंपदाचे सहसचिव डॉ.संजय बेलसरे यांनी केले.

जलसाक्षरता केंद्र,यशदा-पुणे यांचे वतीने शनिवार दि.9 मे रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केलेल्या “पाणी वापर संस्था आणि पाण्याचा कार्यक्षम वापर” या विषयावरील ऑनलाइन आढावा बैठकीत मार्गदर्शन करतना डॉ.बेलसरे बोलत होते. जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे,कार्यकारी संचालक डॉ.सुमंत पांडे,भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ.श्रीनिवास वडगबाळकर,अहमदनगर जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे जलप्रेमी सुखदेव फुलारी,संदीप दरंदले,लक्ष्मण मोहोटे (नेवासा),नाशिक-वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे गोवर्धन कुलकर्णी(ओझर), जलयोद्धा प्रकाश पाटील(सांगली), अविनाश चौघुले,डॉ.दत्तात्रय वणे(राहुरी), मनिषा मोहळकर(श्रीगोंदा),दिपाली शिंदे(कर्जत),यशवंत लोणकर(दौंड),दादासाहेब,यशवंत भोरे(नगर),पाटील(अकोला-बाळापूर),मनोज अनपट(सातारा),प्रकाश जाधव(मान-खटाव),निर्मला कदम,हेमंत झांबरे,दीपक गायकवाड,सुवर्णा आहिरे,राहुल तिव्रकर,तुषार राऊत आदी या आढावा बैठकीत सहभागी झाले होते.

डॉ.बेलसरे पुढे म्हणाले, कोरोनामुळे खुंटलेला संवाद ऑनलाइनने आज सुरू झाला.अडचणी असल्या तरी जलसाक्षरतेचे काम आपल्याला सुरूच ठेवायचे आहे.सध्याचे युग एकट्या शेतकऱ्याचे किंवा एकट्या व्यक्तीचे राहिले नाही तर ते समूहाचे झालेले आहे.ज्या ज्या ठिकाणी समूहाने एकत्र येऊन काम केले जाते तेथे उत्तम काम उभे राहते.आजच्या काळात पाणी वापर संस्थांना मोठे महत्व आहे.संस्थांच्या रूपाने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन व कार्यक्षम वितरण करावे हा खरा पाणी वापर संस्थां स्थापन करण्या मागचा हेतू आहे.पाणी वितरणात येणाऱ्या अडचणी,उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसविण्यात कसरत होत असली तरी यावर मात करता येऊ शकते.त्यासाठी पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करणे,पदाधिकारी-अधिकारी यांना प्रशिक्षण देणे यावर ही काम करावे लागेल.पाणी व्यवस्थापनात महिलांचाही सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करू,त्यांना ही प्रशिक्षण देऊ.पाणी वितरणात पारदर्शकता व सुसूत्रता ठेवण्यासाठी पाणी वापर संस्थाकडे पाणी मागणी अर्ज व पाणी पट्टीची रक्कम ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यावर ही भर देण्यात येईल.

ऑनलाइन प्रणाली आणि प्रशिक्षणाची गरज…

यावेळी सुखदेव फुलारी यांनी आवर्तनापूर्वीची पाणी मागणी आणि आवर्तन सुरू झाल्यावरची पाणी मागणी या मध्ये मोठे तफावत येत असल्याने आवर्तनाचे नियोजन करणे अवघड होते त्यासाठी प्रत्येक पाणी वापर संस्थासाठी पाणी मागणी अर्ज व पाणी पट्टी ऑनलाईन भरता यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात यावी,कालव्या पासून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंतच्या चाऱ्यांची मोठी दुरावस्था झाल्याने पाणी वाया जाते,सिंचनाचा कालावधी वाढतो त्यामुळे सर्व चाऱ्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्थांना काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दयावा,पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी, संचालक व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी,शेतकरी यांना जलसाक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना केल्या. या सूचनांपैकी ऑनलाइन प्रणाली सुरू करणे व प्रशिक्षण देणे या दोन बाबींवर कार्यवाही तत्काळ सुरू करू असे आश्वासन डॉ.बेलसरे यांनी दिले.

स्थानिक ग्रामपंचायतस्तरावर पाण्याचा ताळेबंद तयार करतांना जलदुतांना येत असलेल्या अडचणी,सध्याची पिण्याचा पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याची समस्या,शेवटच्या शेतकरी वर्गाला पाणी भेटत नाही,पाणी वापर संस्थाच्या अडचणी,पाणी वापर संस्थाचे सक्षमीकरण व बांधणी कशी करायची याबाबत ही महत्वाची चर्चा झाली.
नगरचे जलप्रेमी संदिप दरंदले यांनी मानले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here