Shevgaon : शहरातील व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी दयावी – सागर फडके

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – नगरपरिषद हद्दीतील इतर व्यवसाय प्रायोगिक तत्त्वावर व्यापा-यांना परवानगी देण्याची मागणी तहसिलदार मयूर बेरड व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्याकडे बांधकाम समितीचे सभापती सागर फडके यांनी केली आहे.

फडके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना या संसर्गजन रोगामुळे गोरगरीबांचे दोन अडीच महिन्यापासून आर्थिक नुकसान झाले आहे. शहरातील अनेक छोटे मोठे व्यावसायिकांचे पोट त्यांच्या व्यवसायावर अवलंबून आहे. तेथील छोटया मोठया व्यापारी शासनाने दिलेल्या नियमांचे पालक करतील याची मला खात्री आहे. तेव्हा शहरात सोमवार व गुरुवार कापड, टेलर, लॉड्री मंगळवार व शुक्रवार फर्निचर, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, मोबाईल, फोटोस्टुडीओ, भांडी दुकान, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल बुधवार व शनिवार सराफ दुकाने, बेकरी, स्वीटमार्ट, स्टेशनरी, ऑटोमोबाईल, स्पेअरपार्ट,गॅरेज, फुटवेअर रविवार- जीवनावश्यक दुकाने सोडता इतर दुकाने बंद राहतील. अशी पाथर्डी तालुक्यात एक कोरोना पॉझिटिव्ह असतानाही तेथील तहसिलदार नामदेव पाटील यांनी प्रायोगिक तत्त्वावर व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली आहे. तशीच परवानगी येथील येथील तहसिलदार मयूर बेरड व मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी व्यापा-यांना दयावी.

या परवानगीची सर्वांना वेळ निश्चित करुन दयावी. तसेच, शासनाने घातलेल्या निर्बंधातील सलून व्यवसाय, ब्युटीपार्लर, उपहारगृहे, हॉटेल, परमिटरूम, थंडपेय, चहा दुकाने, रसवंती, पानटपरी, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, क्रीडांगणे, प्रार्थनास्थळे यासह गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद राहतील. याची सर्व नागरिक काटेकोरपणे पालन करतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here