Newasa: संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 3 कोटी 41 लाखांचे अनुदान वर्ग…

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नेवासा: नेवासा तालुक्यात संजय गांधी योजने अंतर्गत एकूण दहाहजार एकशे एक लाभार्थ्यांच्या
खात्यात तीन कोटी एक्केचाळीस लाखाचे अनुदान वर्ग झाले असल्याची माहिती संजय गांधी योजना समितीचे नायब तहसीलदार नारायण कोरडे यांनी दिली.


नेवासा तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना, विधवा परित्यक्ता करिता संजय गांधी,तर अपंग लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे यासाठी लाभार्थ्यांचे आलेले अर्ज व निकष तपासून ही प्रकरणे मंजूर करण्यात आली होती.


त्यामुळेच नेवासा तालुक्यात सर्वात जास्त दहा हजार एकशे एक गरजवंत लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ
मिळणार आहे.सदरचे अनुदान एप्रिल मे जून करिता तीन कोटी तीन लाख तीन हजार तर सानुग्रह अनुदान अडोतीस लाख एकोणतीस हजार असे एकूण तीन कोटी एक्के चाळीस लाख बत्तीस हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती संजय गांधी योजना समितीचे नायब तहसीलदार नारायण कोरडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here