Rahuri: ब्राह्मणी ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्राला पुरविले नॉन कॉन्टॅक्ट थर्मामिटर व डिजिटल ऑक्सिमीटर

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

ब्राह्मणी: ब्राह्मणी ग्रामपंचायतीच्या वतीने ब्राह्मणी आरोग्य उपकेंद्राला नॉन कॉन्टॅक्ट थर्मामिटर व डिजिटल ऑक्सिमीटर पुरवण्यात आले. यामुळे संथात्मक विलगीकरन केलेल्या व्यक्तीची तपासणी सोपी होणार आहे.

ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेत विलगीकरन केलेल्या लोकांचे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीकडून देखरेख ठेवली जात आहे. त्यांची नियमित तपासणी केली जात असल्याचे ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे यांनी सांगितले. सार्वजनिक वैद्यकीय अधिकारी डॉ धोत्रे, प्रल्हाद खेडकर, आरोग्य सेविका चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, सरपंच प्रकाश बानकर, ग्रा प सदस्य उमाकांत हापसे, कृषी उत्पन्न बाजार समिती सद्स्य रंगनाथ मोकाटे, माणिक गोरे, प्रेमसुख बानकर, बाबासाहेब भवार आदींच्या मदतीने हे कार्य सुरू आहे. तहसीलदार फसीयूद्दीन शेख, गट विकास अधिकारी खामकर, मंडळ अधिकरी चांद देशमुख हे कामकाजावर लक्ष ठेऊन आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here