Karjat: कडक उन्हापासून बचावासाठी कर्जत युनियन बँकेची मायेची सावली; खातेदारांमध्ये समाधान…

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कर्जत : बँकेच्या कारभारात खातेदार महत्वाचा घटक असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि उन्हाच्या काहिलीपासून त्यांची सुरक्षेततेची हमी घेण्याचा अभिनव उपक्रम कर्जत येथील युनियन बँकेच्या शाखेने घेत खातेदारासाठी चक्क मागील ५३ दिवसापासून मंडप टाकत मायेची सावली देण्याचा प्रयत्न केला आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात केंद्र सरकारने गोरगरीब खातेदाराच्या खात्यावर दरमहा ५०० रुपये टाकले आहे. यामध्ये गरजवंत गरीब निराधार महिलांचा अधिक भरणा आहे यासह पुरुष खातेदाराची संख्या लक्षणीय आहे. कोरोनाच्या काळात आणि भर उन्हात खातेदाराना कोणतीही अडचण येवू नये तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय घेत कर्जत येथील युनियन बँकेच्या शाखेने बँकेसमोर शाखाधिकारी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यानी मंडप टाकत प्रत्येक खातेदाराला सोशल डिस्टिंगचे नियम लागू करीत तोंडाला मास्क बंधनकारक प्रवेश देत आहेत. यासह प्रत्येक खातेदारामध्ये विशिष्ट अंतर ठेवत बँकेचा कारभार पाहत आहे. शहरात अनेक मोठ्या बँका कार्यरत असून त्यापैकी कोणत्याही बँकेनी हा उपक्रम राबविला नाही मात्र युनियन बँकेच्या या मायेची सावलीची सर्वत्र विशेष कौतुक आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here