Beed : टाकळी-रुई शिवारात जुगार अड्ड्यावर छापा

1

पोलिसांकडून पस्तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत

बीड – तालुक्यातील टाकळी रुई रस्त्यावर असणाऱ्या पांडूरंग धोंडे यांच्या लिंबोणीच्या बागेत तिरट खेळताना सहा जण आढळून आल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत पस्तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिस सूत्रांकडून देण्यात आलेली घटनेची माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील टाकळी येथे असणाऱ्या रुई रस्त्यावरच्या पांडूरंग धोंडे यांच्या लिंबोणीच्या बागेमध्ये मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास काही जण तिरट खेळत असल्याची गुप्त माहिती आष्टी पोलीसांना मिळाली. सदर ठिकाणी आष्टी पोलिसांनी छापा मारत घटनास्थळावरुन तिरट खेळताना आरोपी सचिन बबन एकशिंगे, राजू बलभीम चौधरी, प्रल्हाद शिवाजी भवर, राहूल अशोक शितोळे, सर्व रा.टाकळी व काका तुकाराम गाडे रा. साबलखेड यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण 32 हजार 220 रुपये इतका मुद्देमाल जप्त करुन त्यांच्यावर स.पो.नि.अमित करपे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास स.पो.नि. संदिप यादव करीत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून याठिकाणी जुगार चालू असल्याचे एका खब-यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता देशी, विदेशी दारुच्या अवैद्य विक्रीकडे आष्टीचे विशेष पथकाचे पोलिस लक्ष देतील काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here