Beed : शेत जमिनीच्या वादातून तिघांचा खून; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड – जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून तीन जणांचा खून करण्यात आला. ही घटना आज (गुरुवार) पहाटे पाचच्या सुमारास घडली. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील केज तालुका‌ हद्दीतील मांगवडगाव येथे वीस वर्षापासून शेतीचा वाद चालू होता. बाबू शंकर पवार, संजय बाबू पवार आणि प्रकाश बाबू पवार यांचा निंबाळकर कुटुंबियांशी पवार कुटुंबियांचा शेतीचा वाद वीस वर्षापासून चालू होता. पवार कुटुंब हे शेतातच राहत होते. पवार कुटुंब हे पारधी समाजातील असून मांगवगावच्या हद्दीत गेले वीस वर्षापासून पवार कुटुंब राहत होते.

निंबाळकर व पवार यांच्यात सतत भांडणे होत असत. निंबाळकर कुटुंबातील एकाची वीस वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती. यातील मुख्य आरोपी शंकर पवार, संजय पवार, प्रकाश पवार यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातून हे तिन्ही आरोपी निर्दोष मुक्त झाले होते. सदरील शेतीचा प्रकरण कोर्टामध्ये चालू असताना त्यांचा निकाल पारधी समाजातील पवार कुटुंबाच्या नावे कोर्टाने दिला. परिणामी निंबाळकर कुटुंबीयांच्या विरोधात शेतीचा निकाल गेल्यामुळे त्यांना त्याचा राग आला व रागाच्या भरात निंबाळकर कुटुंबीयांनी पवार कुटुंब याचा काटा काढण्याचे ठरवले.

मध्यरात्री ट्रॅक्टर भरून दहा ते वीस लोक पोलिसांच्या अंदाजानुसार त्यांच्या गाव वस्तीवर गेले आणि पारधी कुटुंबावर त्यांनी हल्ला चढविला या हल्ल्यामध्ये तीन जण जागीच मयत झाले. एकाची प्रकृती जखमी असून शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष फौजदार हे घटनास्थळी पोहोचले असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीने गुन्हा कबूल केल्याचे कळते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी मांगवड गावातील बरेचसे लोक केज येथील ठाण्यात चौकशीसाठी आणले आहे. बीड जिल्ह्यामध्ये संचारबंदी असतानाच एकीकडे उपासमारीची वेळ एकीकडे संचारबंदी अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये तीन जणांची हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक केजपोलीस स्टेशन येथे तळ ठोकून आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here