Shrirampur : प्रवरा नदीत पडून उक्कलगावच्या तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावची घटना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

उक्कलगाव – येथील प्रगतशील शेतकरी व अशोक कारखान्याचे शेतकी विभागाचे कर्मचारी दीपक बाबुराव (विठ्ठलराव) थोरात (वय 48) (दि 13) यांचा काल उक्कलगाव मधीलच यांच्या शेताजवळून जाणाऱ्या प्रवरा नदीपात्रात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

कालच ते पाचच्या सुमारास शेतातच औषध फवारणी करत होते. पाणी संपले म्हणून ते नदीपात्राकडे गेले असता पाणी घेत असतानाच त्यांचा तोल जाऊन नदीत पडले. त्या ठिकाणावर नदीपात्र खोल असल्याने कारणाने अन् दुर्दैवाने त्यांना पोहता येत नव्हते. काही अंतरावर असणार्‍या पुतण्या राहुल याने त्यांच्या घटना लक्षात येताच त्याने पाण्यात उडी घेतली त्यालाही पोहता येत नव्हते. त्यावेळी आसपास कोणीही नव्हते. त्यामुळे त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले अशा प्रकारे त्यांची गावातच खबर लागताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती. बेलापूर पोलिस नाईक ढोकणे पोलिस भोईटे घटनास्थळी दाखल झाले होते. उक्कलगावमधील काही पोहणारे तर गळनिंब लट्टल पोहणारे तरुणाच्या मदतीने शोध मोहिम सुरू करत अवघ्या काही तासातच मृतदेह तरुणाच्या हाती लागला होता.

कोणतेही विलंब न करताच साखर कामगार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला रात्री उशिराच उक्कलगाव अमरधामात अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दीपक थोरात हे अत्यंत सरळ मार्गाने चालणारे मितभाषी स्वभावाचे होते नुकताच काही महिन्यांपूर्वी त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा विवाह साध्या पद्धतीने झाला होता. समाजासमोर ते एक आदर्श ठेवून गेले देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराजांचे ते शिष्य होते. महाराजांच्या हस्ते हनुमान मंदिराची स्थापनाही केली होती.

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सुन पाच भाऊ बहीण चुलते पुतणे भावजया, असा मोठा परिवार असून अशोक कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब हरी थोरात यांचे ते पुतणे, शरद बाबुराव थोरात यांचे ते कनिष्ठ बंधू होत यांच्या अकाली निधनाने उक्कलगाव व अशोक अद्योग समूहात शोककळा पसरली आहे.

4 COMMENTS

  1. This design is wicked! You most certainly know how to keep a reader entertained. Between your wit and your videos, I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Wonderful job. I really loved what you had to say, and more than that, how you presented it. Too cool!

  2. A lot of thanks for all of your labor on this web site. My mom takes pleasure in working on investigation and it is simple to grasp why. A lot of people learn all regarding the compelling way you make useful solutions by means of this web blog and even increase participation from other ones about this article while our own child is always studying a great deal. Take advantage of the rest of the year. Your conducting a very good job.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here