Newasa : सोनईत तंबाखू झाली पाच हजार रुपये किलो; औषधाच्या पाकीटातून तंबाखूची विक्री

औषधाच्या पाकिटातून तंबाखूची विक्री

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई – संपूर्ण जगात कोरोनाची दहशत असून भारतात देखील कोरोनाचा कहर दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाउन हाच एक उपाय सध्यातरी असल्यामुळे लॉकडाउनचा परिणाम सगळ्याच क्षेत्रात होत असून बहुतांश बाजारपेठा बंदच  आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तू थोड्याफार प्रमाणात मिळत आहेत. सर्वसामान्य जनता त्यातच समाधानी आहेत. पण खरी अडचण झाली ती तळीरामाची.

आत्तापर्यंत जशी मिळेल तशी मग त्यासाठी कितीही जास्त किंमत द्यायला तयार होतआहेत. पण आता दारुही मिळायला तयार नाही. ज्यांना गुटख्याची सवय आहे. ते गुटखा मिळत नाही म्हणून तंबाखूवर आपली तल्लफ भागवत आहेत. सिगारेट ओढणारे आता बीडी पितात पण आता काहीच मिळेनासे झाले. दहा रुपयांची तंबाखूची पुडी पन्नास रुपयाला झाली. एका पुडीत दहा ग्रॅम तंबाखू असते त्याचा हिशोब केला तर ती तंबाखू पाचहजार रुपये किलो पडते.

सरासरी एक माणसाला रोज एक पुडी सहज लागते म्हणजे लॉकडाउन चार संपेपर्यंत पाचहजार रुपयांची तंबाखू खाणारा गरीब कसा ? हा प्रश्नच आहे. आता तंबाखू मिळेनासी झाली. त्यावर पर्याय म्हणून सुटी (गावरान) तंबाखू औषधी गोळ्या मिळणाऱ्या पाकिटात तंबाखू पॅक करून सोनईत किराणा दुकानातून चोरुन लपून विक्री सूरु असून आपले उखळ पांढरे करून बाजारबंद असताना कोरोना म्हणजे केवळ पैसा कमवण्याची संधी म्हणूनच आपला फायदा करून घेत आहेत. याकडे प्रशासन देखील डोळेझाक करत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here