Newasa : विनापरवाना देशी दारूची वाहतूक करताना दोघेजण ताब्यात 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नेवासा – कारमध्ये विनापरवाना बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक करताना नेवासा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त बातमीदारामार्फत समजलेल्या माहितीनुसार नेवासा पोलीस निरीक्षक यांच्या तोंडी आदेशाने खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबल योगेश आव्हाड, अशोक कुदळे राहुल यादव यांनी ही कारवाई केली. अहमदनगरकडून औरंगाबादच्या दिशेने मारुती सुझुकी कंपनीची एक गाडी बेकायदेशीर देशी दारू घेऊन निघाल्याची बातमी पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, देवगड फाटा येथे नाकाबंदी केल्यानंतर नेवासा पोलिसांना ही गाडी मिळाली. सदर गाडीमध्ये १२,४८० रुपये किंमतीच्या भिंगरी देशी दारूच्या सिलबंद २४० बाटल्या प्रत्येकी १८० मिलीच्या किंमत प्रत्येकी ५२ रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी संतोष उर्फ राजू अरुण जगताप (वय ३९) रा. सावतानगर, नेवासा फाटा ता. नेवासा विकास बाळासाहेब पाठक वय (वर्षे ४०) रा.सावतानगर, नेवासा फाटा यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास राहुल यादव हे करत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here