Shrigonda : निवडणुकीत गल्लीबोळात फिरणारे नेते बसले बिळात

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – राज्यात व जिह्यात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रोज आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे  राज्यात व जिह्यात व गावागावात सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले आहे. अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांचे व्यवसाय देशोधडीला लागले आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी माणसाची माणुसकी जागी झाली व माणसाने माणसासाठी मदत पोहोचली. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून अशी परिस्थिती असताना प्रत्येक वेळी आश्वासनांची खैरात देणारे नेते ते जनतेच्या पाठीशी कायम उभे राहण्याचे आश्वासन देणारे नेते नेमके कुठे आहेत याचा प्रश्न आता जनतेला पडू लागला आहे.

जनता विचारु लागले आहे. गल्ली गल्ली बोळात निवडणुकीसाठी फिरणारे पायाला फोड येईपर्यंत मत मागायला येणारे नेते आता नेमक्या कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत. नेमके हे बाहेर तरी कधी येणार त्यांना बाहेर काढण्यासाठी नेमकी कोणती पुंगी वाजवण्याची गरज आहे, असा सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे.

निवडणूक जनतेच्या जीवावर निवडून तालुक्यात जिह्यातील राज्यावर राज्य करणारी लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेसाठी किती धावली किती लोकांना त्यांनी मदत पोहोचवली किती लोकांचे अश्रू पुसले, असा सवालही आता यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. श्रीगोंदा तालुक्यात देखील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर सभापती उपसभापती इतकेच नव्हे तर जिल्हास्तरीय आमदार खासदार तालुक्यातल्या जनतेला विचारण्यासाठी कधी आले काय मदत पोहोचली किती जणांचे अश्रू पुसले किती जणांना अन्नधान्य पुरवले किती बेरोजगार कुटुंबाला मदत केली, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर आ वासून उभे राहिले आहेत काही नेत्यांनी काही लोकांपर्यंत स्वतःचे लेबल लावलेले अन्नधान्याचे पॅकेट पोहोचवले.

मात्र, ख-या अर्थाने ज्यांना गरज आहे हे खरंच पीडित आहेत, अशा तालुक्यातल्या अनेक गोरगरिबांच्या कुटुंबात मदत पोहोचणे गरजेचे होते. मात्र, अद्यापही एकाही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मदत पोहोचली नाही, याची खंत तालुक्यातल्या अनेक पोटाला खळगे पडणा-या गरिबांनी बोलून दाखवली डोंगरांमध्ये मतं मागण्यासाठी पांढरेशुभ्र कपड्यात आलिशान गाड्यांमध्ये गेलेले नेते आता अडचणीच्या काळात संकटाच्या काळात कुठे गायब आहेत.

अशा संकटाच्या काळात या लोकप्रतिनिधींच्या घरामध्ये अन्नधान्याची गोदामे भरली आहे. मात्र, ज्या जनतेच्या जीवावर यांनी आजपर्यंत राज्य केले त्या जनतेला एक वेळचं पोटभर अन्नधान्य द्यावे, अशी इच्छा देखील प्रतिनिधीची कधी होणार अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मतांवर निवडून आलेल्या प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येकाची अडचण जाणून घेणे गरजेचे होते. गोरगरिबांसाठी हीच वेळ होती. सेवा करण्याची स्वखर्चाने मात्र काही मोजकी मंडळी सोडली तर 70 टक्के नेते मंडळी आपापल्या बीळमध्ये दबा धरून बसले होते. कारण यांना समाजामध्ये फिरत असताना कोरोना होण्याची भीती आहे.

श्रीगोंदा तालुका करोनामुक्त आजपर्यंत आहे. पण हे सर्व होत असताना तालुक्यातील प्रशासकीय अधिका-यांनी मोलाची साथ दिली. गोरगरिबांपर्यंत पोहोचून त्यांना अन्नधान्य दिलं तालुका कसा करुणा मुक्त होईल. तालुक्यासाठी काय यंत्रणा लावता येईल यासाठी तालुक्यातील त्रिमूर्तीं नी जीवाचे रान उठवले व शेवट तालुक्यामध्ये कोणाची लढाई जिंकली गेली. मात्र, हे सर्व होत असताना जे लोक प्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिलेले आहेत. ते पंचायत समिती सदस्य सभापती असो उपसभापती असो जिल्हा परिषद सदस्य असो मोजके सोडले तर बाकीचे नेमके होते तरी कुठे असा आहे यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होतो.

ख-या अर्थाने आज जगावर येवढे मोठे संकट आले असताना यामध्ये तालुक्यातील सर्व प्रशासकीय पदाधिकारी ,सर्व गावचे सरपंच, सर्व गावच्या दक्षता कमिटी, युवा मंडळे यांनी आप आपल्या परीने मदत केली. योगदान दिले, देत आहे. पण काही मंडळी निवडणूक असली तरच जावळीत थांबायचं येणा-या नेत्याच्या पुढे पुढे करायचं आणि स्वतःची……बडवून घेऊन लोंकाना दाखवयचं की मला किती काळजी आहे. आज इथे थांबून गावतील, तालुक्यातील परिस्थिती हातळणे गरजेच होते. तसे न करता गाव, गण, तालुका वा-यावर काही मंडळींनी सोडला आहे.

अशांना येणा-या काळामध्ये जनतेने धडा शिकवणे गरजेचे आहे. जे जे लोकप्रतिनिधी सध्याच्या अडचणीच्या काळामध्ये बिळात दबा धरून बसलेले आहेत. त्यांना बिळातून काढण्यासाठी येणा-या निवडणुकीमध्ये जनतेने त्या वेळात मिरचीचा धूर सोडून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे, असा संतप्त इशाराही उपासमारीत होरपळलेला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here