Beed : आष्टी तालुक्यातील १०५ परप्रांतीय मजूर गावी पोहोचले

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड – तालुक्यात विविध गावात आलेले सुमारे ८० मजूर सोमवारी तर २५ मजूर बुधवारी त्यांच्या गावी रवाना झाले. ८० मजूर रेल्वेने तर २५ मजूर एस टी बसने रवाना झाले. आमदार सुरेश धस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला.

टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यापासून विविध गावात अडकलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावाकडे जाण्यास उत्सूक आहेत. अशा मजुरांनी आमदार सुरेश धस आणि तहसीलदार निलिमा थेऊरकर यांच्याशी संपर्क साधला. सोमवारी ८० मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी नगर रेल्वे स्टेशनपर्यंत पाठवण्यात आले. तेथून त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीट देखील कन्फर्म करून देण्यात आले.
आष्टी येथील सुनील रेडेकर, सचिन रानडे, चिंटू अग्रवाल, सरपंचपती अनिल ढोबळे यांनी यासाठी प्रयत्न केले. छत्तीसगड राज्यातील २७ तर उत्तर प्रदेश मधील ५३ मजूर सोमवारी गावी परतले. तर बुधवारी मध्यप्रदेशातील २५ मजुरांना एस टी बसने मध्यप्रदेश सीमेपर्यंत सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here