Shrigonda : कृषी विद्यार्थ्यांचा उपक्रम; 1 लाख 11 हजार 111 रु मुख्यमंत्री निधीला मदत

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीचे मंडळ कृषी अधिकारी आबासाहेब भोरे व कृषी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम,  मुख्यमंत्री सहायता निधीला 111111 चा मदतनिधी केल्यामुळे तालुक्यातून एकच चर्चेचा विषय ठरला आहे.

कोरोनाच्या संकटात कृषि महाविद्यालय बदनापूरच्या माजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला रु. 111111 (एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये ) मदत केली आहे. सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशामध्ये महाराष्ट्राला जास्त फटका बसला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे, आवाहन केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत व राज्याचा एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून बदनापूर कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी राज्य सरकारला तब्ब्ल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची आर्थिक मदत ऑनलाईन स्वरूपात प्रदान केली.

विविध शासकीय पदावर अधिकारी, बँकिंग अधिकारी, शेतकरी, बियाणे कंपनीत अधिकारी, बाहेर देशात असणारे काही अधिकारी, कृषि उद्योजक असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बीडीएन कट्टा या ग्रुपच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला उचलून धरत ग्रुपमधील सहकार्यांनी एकमेकांशी चर्चा करून दोनच दिवसात 110 विध्यार्थीनिने मदत करण्याचे निश्चित केले.

महाराष्ट्र शासनाने याची दखल घेत आभाराचे पत्र बीडीएन कट्टा  ग्रुपला पाठविले आहे. यासाठी मंडळ कृषि अधिकारी आबासाहेब भोरे, शरद देशमुख, अमृत दहातोंडे, सुधीर चव्हाण, अशोक सव्वाशे, रुपाली भगत यांनी परिश्रम घेतले. कृषि महाविद्यालय बदनापूरच्या माजी विध्यार्थीनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here