Shevgaon : अज्ञात महिलेने बनावट पासबुकच्या आधारे बँकेतून काढले 10,000 रुपये

0

बोधेगाव सेंट्रल बॅंकेतील प्रकार 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून एका अज्ञात महिलेने बनावट पासबुक सादर करुन दि.३० एप्रिल २० रोजी बालमटाकळी येथील शिवकन्या लक्ष्मण फाटे या महिलेच्या बोधेगाव येथील सेंट्रल बँकेच्या खात्यामधून चक्क 10 हजार रूपयांची रोख रक्कम काढून नेल्याचा धक्कादायक प्रकार दि. १४ में २०२० रोजी उघडकीस आला आहे.

याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी आहे की, बालमटाकळी येथील रहिवासी असलेली महिला शिवकन्या लक्ष्मण फाटे यांचे बोधेगाव येथील सेंट्रल बँकेत खाते असून (दि. १३) सदरील महिला आपल्या पतीसोबत जनधन योजने अंतर्गत मिळणाऱ्या रकमेची शहानिशा करण्यासाठी बँकेत आली असता यांनी शिल्लक रकमेची चौकशी केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यामधून चक्क दहा हजार रूपये कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हा सर्व घडलेला प्रकार त्यांनी बँकेचे शाखाधिकारी दिगंबर कदरे यांना सांगितले असून कदरे यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल व जो कोणी व्यक्ती असा गंभीर स्वरुपाचा व फसवणुकीचा प्रकार केला असेल अशा दोषी व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करुन तुमच्या रकमेची भरपाई देण्यात येईल, असे त्यांनी खातेदार महिला यांना सांगितले आहे.

घडलेला हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असून याविषयी आम्ही सदरील घटनेची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तिविरोधात कायदेशीर करवाई करण्यात येईल. आणि सदरील आमच्या बॅंकेच्या महिला खातेदार यांना रितसर न्याय देण्याचा आम्ही प्रयन्त करू सदरील खातेदार यांना भरपाई देण्यात येईल.

(दिगंबर कदरे-शाखाधिकारी सेंट्रल बँक ऑफ़ इंडिया बोधेगाव)

दि. १३ में २० रोजी मी माझ्या पती सोबत जनधन योजने अंतर्गत मिळणाऱ्या रकमेची शहानिशा करण्यासाठी बोधेगाव येथे बँकेत गेले होते. त्यानुसार शिल्लक रकमेची बँकेत चौकशी केली असता हा फसवणुकीचा प्रकार आमच्या लक्षात आला असून आमची झालेली फसवणुकीची योग्य ती चौकशी करुन दोषी व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी व आमच्या रकमेची भरपाई मिळावी.
(शिवकन्या लक्ष्मण फाटे- महिला बालमटाकळी)

बँकेचे पासबुक दाखविल्या शिवाय पैसे काढता येत नाही.-
सदरील घडलेल्या घटने विषयी आमचे प्रतिनिधी यांनी बॅंकेतील कॅशिअर यांचेकडे चौकशी केली असता आम्ही खातेदार यांना रक्कम द्यायची असेल तर सर्वांचे पासबुक पाहतो तसेच गरज पडली. तर आधार कार्ड सुद्धा पाहतो तरच त्यांना आम्ही रक्कम देतो, अशी माहिती बॅंकेच्या कॅशिअरकडून देण्यात आली आहे.
(प्रशांत थेटे- कॅशिअर ,सेंट्रल बँक ऑफ इंडिया बोधेगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here