Sangamner : कोरोनाचा एकही रुग्ण अथवा संशयीत नसताना कुरण गाव ठरला ‘हॉटस्पॉट’!

0

नागरिकांची उच्च न्यायालयात धाव 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेर – तालुक्यातील कुरण या गावात आतापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. तसेच या गावातील एकही व्यक्ती संशयित म्हणून तपासणीसाठी शासनाने अद्यापही नगरला पाठविली नाही. अशी परिस्थिती असताना सुद्धा हे गाव हॉटस्पॉट म्हणून प्रशासनाने जाहीर केलेला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांनी या आदेशाविरुद्ध औरंगाबाद येथील उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.

या याचिकेमध्ये शहरातील कुरण रोड येथे कोरोना पॉझिटिव्ह एक रुग्ण आढळलेला आहे. तर कुरण रोड ते कुरणगाव याच्यामध्ये सुमारे पाच किलोमीटरचे अंतर आहे, असे असताना सुद्धा तालुक्यातील कुरणगाव हे हॉटस्पॉट गाव म्हणून जाहीर केल्याने या गावातील नागरिकांकडे तालुक्यातील नागरिकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून या गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने हे गाव हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलेले आहे. हा आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी जाहीर विनंती या गावातील ग्रामस्थांनी केली आहे. तसे निवेदन ही जिल्हाधिका-यांना पाठविण्यात आले आहे. या अन्यायकारक निर्णया विरुद्ध हायकोर्टात याचिका देखील जाहीर केलेली आहे.

कुरण हे गाव तालुक्यातील व्यापार आणि शेतीसाठी एक प्रसिद्ध गाव आहे. परंतु या गावात कुठलाही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नसतानाही हे गाव हॉटस्पॉट म्हणून जाहीर केल्याने या गावातील संपूर्ण जनजीवन ठप्प झालेले आहे. या निर्णयाविरुद्ध या गावातील ग्रामस्थ मोहम्मद हनीफ अब्दुल करीम शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांनी गावावर अन्याय झाला असून तेथील लॉक डाऊन उठविण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here