Shrirampur: माळवाडगांव परिसरात मोफत सर्वरोग निदान शिबिरात १६८ रुग्णांची तपासणी

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

माळवाडगांव – लाॅकडाऊन सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने माळवाडगांव ग्रामपंचायत व माळवाडगांव विविध सेवा सोसायटीच्या वतीने माळवाडगांव येथील नागरिकांसाठी आज गुरुवार दि.१४ रोजी मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबीर पार पडले.
यावेळी सरपंच बाबासाहेब पा चिडे, चेअरमन गिरीधर पा आसने यांच्या हस्ते दिवंगत खासदार पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
गावातील अनेक गरजू व गरिब रुग्णांना विविध व्याधीसाठी शहरात जाऊन उपचार घेणे व औषधोपचाराचा होणारा खर्च परवडत नसल्यामुळे माळवाडगांव गावात मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार अभियान आयोजित करुन सर्व रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आला आहे. गावातील व परिसरातील १६८ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत मोफत आरोग्य तपासणी करुन घेतली व मोफत औषधाचाही लाभ घेतला.

यावेळी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची थर्मल चाचणीही घेण्यात आली. कोरोनामुळे सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन यावेळी करण्यात आले. यावेळी डॉ.विखे पाटील मेमोरियल फाऊंडेशन व सिंधुताई विखे पाटील कार्डीयाक सेंटरचे डॉ.सचिन चौधरी, डॉ.दिव्या अग्रवाल, प्रदिप लोखंडे, सुदाम भागवत, सिस्टर प्रतिभा जऱ्हाड, उषा थोरात, बापू बलमे, राजु येवले, सोमनाथ गागरे यांनी वैद्यकीय सेवा दिली.

यावेळी नानासाहेब आसने, रावसाहेब काळे, गोरख आसने, दिलीपराव हुरुळे,गोकुळ ञिभुवन,बबन आसने,भाऊसाहेब आसने,साहेबराव आसने,बाळासाहेब आसने,शरद आसने,एकनाथ आसने,प्रदिप आसने,दिलीप आसने,मुरलीधर कर्पे,शिवाजी आसने,बाळासाहेब खताळ,किशोर ञिभुवन,संजय बाबर,मच्छिंद्र गाढे,भारत थोरात,राजेंद्र आदिक,विठ्ठल बोर्डे,तुळशीराम आसने,रावसाहेब आसने,भाऊसाहेब मोरे,नरोडे मामा,पञकार विठ्ठलराव आसने,पञकार संदिप आसने यासह आदि यावेळी उपस्थित होते. यावेळी माळवाडगांव ग्रामपंचायत व सोसायटी यांनी डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे आभार मानले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here