Lockdown 4.0 : नव्या लॉकडाऊनमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू करण्याचा सरकारचा विचार

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

सध्याचा लॉकडाऊन संपत आला असून लवकरच लॉकडाऊन 4.0 सुरू होणार आहे. या नव्या लॉकडाऊनमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. काही विशेष भागात हवाई यात्रा आणि बससेवा सुरू होऊ शकते, असे केंद्रीय गृहमंत्रालयातील विशेष अधिका-यांना एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

याबाबत राज्यांसोबत बोलणी सुरू आहे. तसेच कोणत्या भागात सुरू करायचे आणि कोणत्या भागात सुरू नाही करायचे या बाबत राज्यसरकारांशी सरकारची बोलणी सुरू आहे.

त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणास्तव अडकून पडलेल्या नागरिकांना येणेजाणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here