Nashik : २०२५ पर्यंत नाशिक विभागातून हिवताप (मलेरिया) होणार हद्दपार डॉ. गांडाळ

4
२०१० मध्ये १०, ७२५ तर २०१९ मध्ये फक्त ४६ रुग्ण आढळले
 
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नाशिक – मलेरिया प्रतिबंधक कार्यवाही योग्य पद्धतीने केल्याने भारतातून मलेरिया हद्दपार होण्याच्या मार्गावर असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील मलेरिया प्रतिबंधक औषधींची मागणी देखील वाढत आहे, अशी माहिती आरोग्य सेवा (हिवताप) नाशिक विभागाचे सहायक संचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ.गांडाळ यांनी म्हटले आहे की, नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार व धुळे अशा पाच जिल्ह्यांचा समावेश असून यातील 431 ठिकाणी मलेरिया चिकित्सालये व उपचार केंद्रे स्थापन केलेली आहेत. नाशिक विभागात अलीकडच्या काळात मलेरियाची रुग्ण संख्या वर्षानिहाय कमी कमी होताना दिसत असल्याकडे त्यांनी याद्वारे लक्ष वेधले आहे. नागरिकांत वाढलेली जागरूकता तसेच कार्यतत्पर आरोग्य सेवा याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत असलेली उपाययोजना व दाखविण्यात येत असलेली सतर्कता याबरोबरच व्यापक स्वरूपात केलेली जनजागृती यासाठी महत्वपूर्ण ठरल्याचे डॉ. गांडाळ यांनी यात नमूद केले आहे.
किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिक येथे सहायक संचालक (हिवताप), नाशिक विभाग हे विभागीय कार्यालय असून किटकजन्य आजारात प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुणिया, हत्तीरोग यासारख्या आजारांचा समावेश होत असल्याचे डॉ. गांडाळ यांनी स्पष्ट केले आहे. यात त्यांनी पुढे असेही नमूद केले आहे की, एक वेळ अशी होती की, मलेरियाच्या साथीने सर्वत्र थैमान घातल्याने त्यात अनेकांचे बळी गेले होते. मलेरिया आजारावर वेळीच समूळ औषधोपचार घेतल्यास त्यावर हमखास नियंत्रण मिळविता येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आजाराचे रुग्ण व मृत्यूचे प्रमाण पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे नमूद करताना नाशिक विभागातील 54 तालुक्यांमध्ये हा आजार होऊच नये यासाठी आरोग्य कर्मचारी सातत्याने जनजागरण मोहिमा राबवत असल्याचा मुद्दा ठळकपणे स्पष्ट केला.
या सर्व उपाययोजनांमुळे मलेरिया रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आल्याबरोबरच गेल्या सुमारे एक तपाच्या कालावधीत मलेरिया रुग्ण संख्येत लक्षणीय घट दिसून येत एकाही व्यक्तीचा मलेरियामुळे मृत्यू झाला नसल्याचे अभिमानाने त्यांनी उल्लेख केला. 2008 ते 2019 या कालखंडात हिवताप रुग्णाचे वर्षानिहाय घटते प्रमाण दिसून आले असून 2020 मध्ये ते अगदीच नगण्य असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. 2008 मध्ये 6244 इतकी असलेली रुग्ण संख्या 2019 मध्ये केवळ 46 इतकी आहे. त्यातही नाशिक, अहमदनगर, जळगांव या तीन जिल्ह्यांत ही संख्या अत्यल्प असून नंदुरबार व धुळे या दोन जिल्ह्यांत जे काही रुग्ण आढळतात ते चरितार्थासाठी शेजारच्या गुजरात, मध्यप्रदेश सीमा भागातील स्थलांतरीत मजुरांमध्ये प्रामुख्याने असल्याचा दावा डॉ. गांडाळ यांनी केला आहे.
2019 मध्ये संकलित करण्यात आलेल्या नाशिक विभागातील एकूण 2 कोटी 12 लाख 15 हजार 86 लोकांपैकी 26 लाख 85 हजार 955 रक्तनमुने तपासणीत फक्त 46 हिवतापाचे रुग्ण आढळल्याचे डॉ.गांडाळ यांनी स्पष्ट केले आहे. एप्रिल 2020 अखेर नाशिक विभागात 7 लाख 11 हजार 67 रक्त नमुने तपासले असता केवळ 8 हिवतापाचे रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगून आशा व आरोग्य कर्मचार्यांमार्फत नियमित रक्त नमुने घेऊन तपासणी करून रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याचा हा परिपाक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नाशिक विभागात हिवताप रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असल्यानेच लवकरच नाशिक विभाग हिवताप (मलेरिया) मुक्त होईल, असा विश्वास डॉ.गांडाळ यांनी याद्वारे व्यक्त केला आहे.
डॉ. गंडाळ हे जेंव्हापासून सहायक संचालक हिवताप या पदावर हजर झाले तेव्हापासून त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून अनेक उपाययोजना या नाशिक विभागात केल्या उत्तम नियोजन, कर्मचारी समन्वय, तसेच विभागामध्ये वेळोवेळी भेटी देऊन जनजागृती केली कदाचित त्यांच्या या कष्टाचे फळ म्हणूनच नाशिक विभाग हा मलेरिया मुक्ती कडे वाटचाल करीत आहे.

कमलेश गायकवाड अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष एससी विभाग
कोट – डॉ पी डी गंडाळ
प्रशासनात अधिकारी व कर्मचारी यांचा योग्य समन्वय मेळ साधंल्याने व कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क जोपसल्याने त्यांचेही सहकार्य उत्तम लाभले. रिक्त पदे असूनही उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेळोवेळी गौरव केला. तसेच कर्मचाऱ्यांना नियमित व वेळेवर पदोन्नती देणे. कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना १२ वर्षे, २४वर्षे लाभ तसेच नवीन शासन निर्णयानुसार सेवेत १०,२०,३० वर्षे लाभ राज्यात सर्वात अगोदर प्रदान,
कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक व सोयीनुसार समुपदेशन करून बदल्या, वरील गोष्टी ही हिवताप मुक्तीकडील वाटचाल करण्यास सहाय्यभूत ठरत आहेत.

4 COMMENTS

  1. हिवताप मलेरिया योद्धा…. डॉ साहेब आपल्या विस्वासाला गरुडाची उंच भरारी मिलो खुप बारकाईने आपण अभ्यास केलेला आहे त्या मुलेच आपण आपली भूमीका इतक्या प्रखर पणे मांडली. पुढील वाटचालीस शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here