Newasa : सोनई येथील कौतुकी नदी वरील पुलाचे काम निकृष्ठ; काम थांबवण्याची गावक-यांची मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई – राहुरी ते शनि शिंगणापूर या पंचवीस किलोमीटर या रस्त्याचे पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत एकशे अकरा कोटीचा निधी मंजूर होऊन संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणचा असून त्यामध्ये सोनई येथील कौतुकी नदीवरील पूल देखील असून तीन ते चार दिवसापासून या पुलाचे काम चालू केले.

या पुलाची लांबी 15 मीटर असून रुंदी वीस मीटर असून हा पूल सोनई गावासाठी फार महत्वाचा असून नेमक्या याच पुलाचे काम निकृष्ट होत असून मजबुतीच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसून पूल करताना एक गोणी देखील सिमेंट न वापरता १.६० मीटर व्यासाच्या सिमेंटच्या जलवाहिनी नळ्या टाकल्या असून मुरुम पसरून दाबल्या आहेत. नळ्याखाली काँक्रिटीकरण करणे आवश्यक होते ते केलेले नाही. कुठेही सिमेंटचा, लोखंडी गज न वापरता कमी वेळेत या पुलाचे काम पूर्ण करायचे. ब्राह्मणी ऊंबरे पिंपरी येथील पुलाचे काम करताना खाली काँक्रीटीकरण करुन त्यावर कॉलम घेऊन मो-या तयार केल्या आहेत. मग सोनईसारख्या मोठ्या महत्त्वाचा असणाऱ्या पुलाचे काम एवढे निकृष्ट कसे.

पावसाळ्यात कौतुकी नदीस कायमच पाणी येते. पहिल्याच पावसाने हा पूल वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हे काम त्वरीत बंद करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत असून ठेकेदाराने गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पुलाचे काम योग्य पद्धतीने करावे म्हणजे भविष्यात गावाला त्रास होणार नाही.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here