Pathardi : महामार्गावर वाहने आडवी लावून लूटमार करणारी टोळी 12 तासांतच जेरबंद

2

वजीर शेख । राष्ट्र सह्याद्री

पाथर्डी : महामार्गावर वाहने आडवी लावून ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद करण्यात पाथर्डी पोलिसांना यश आले. फुंदे टाकळी फाटा येथील लुटमारीच्या घटनेनंतर अवघ्या बारा तासात पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला.

याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील महामार्ग फुंदेटाकळी फाटा येथे दिनांक 13 मे रोजी ट्रक लुटण्यात आला होता. संगमनेर तालुक्यातील घुलेवादी येथील ट्रकचालक मुकेश कुमार जयस्वाल (वय २७ वर्ष) व क्लिनर  कमालुमुद्दिन इद्रीस हे ट्रक क्रमांक एम एच 15 DK 6600 मधून नांदेडहुन परभणी, माजलगाव मार्गे नगरकडे जात होते. त्यांना दुपारच्या 3:30 च्या सुमारास टाकळी फाटा येथे पाठीमागून आलेला टेम्पो (क्रमांक MH 16 CC. 6708) आडवा लावून चार जणांनी मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, व गाडीतील टेप रेकॉर्ड असा एकूण 30 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात भादवि कलम 394 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सूचना दिल्या.

या पथकातील पोलिस कर्मचारी संतोष लोंढे, रवींद्र कर्डिले, रवी सोनटक्के, प्रकाश वाघ, रवींद्र घुंगसे, विनोद मासाळकर, जालिंदर माने यांनी फिर्यादीची भेट घेऊन गुन्ह्यातील आरोपी व त्याच्या वर्णनाबाबत माहिती घेतली. पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, सहकारी पोलीस सागर बुधवंत, चालक पोलिस संदीप चव्हाण, पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण, काकासाहेब राख, चालक पोलीस कॉन्स्टेबल तांबे यांनी आरोपी जाकिर सुभान शेख (वय 24 वर्षे फुंदे टाकळी तालुका पाथर्डी) यास अटक केली. त्याच्यासह साथीदार रूपचंद आंधळे, शंकर फुंदे व गोकुळ फुंदे अशांनी मिळून रूपचंद आंधळे यांच्या टेम्पोत जाऊन केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला 9 लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here