Karjat : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी, तहसीलदार वाघ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत – छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६३ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी कर्जत येथे तहसिलदार सी एम वाघ यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले. 

१४ मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कर्जत शहरात साजरी करण्यात आली. यावेळी कर्जतचे तहसिलदार सी एम वाघ यांच्या हस्ते सकाळी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्वांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळत छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चापडगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, सकल मराठा समाज कर्जतचे प्रमुख समन्वयक तानाजी पाटील, संभाजी ब्रिगेडचे कर्जत तालुकाध्यक्ष निलेश तनपुरे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल नवले, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे, अड धनराज राणे, काकासाहेब काकडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here