आषाढी वारी : अजित पवारांसोबत आळंदी देवस्थान विश्वस्तांची बैठक; पालखी सोहळ्यासाठी तीन पर्याय

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

महाराष्ट्राचे व वारक-यांचे आराध्य दैवत असणा-या विठुरायाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यावर यावर्षी कोरोनाचे संकट टांगले आहे. दरवर्षी हा सोहळा जूनमध्ये होत असतो. महाराष्ट्रातून 15 ते 20 लाख लोक विठू रायाच्या गजरात पायी-पायी पंढरपूरला जातात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी आषाढी पालखी सोहळा होणार का नाही हा मोठा प्रश्न आहे. या संदर्भात आळंदी देवस्थान विश्वस्थांची अजित पवारांसोबत बैठक झाली. या बैठकीत देवस्थानच्या वतीने तीन पर्याय सुचवण्यात आले आहे. 

  • 300 वारकरी घेऊन वारी करण्याची परवानगी द्या
  • 200 मानाचे दिंडीप्रमुख आणि विणेकरी यांना घेऊन वारी करण्याची परवानगी मिळावी
  • वाहनात पालखी घालून 40 वारकरी पंढरपुरला जातील

    आळंदी ग्रामस्थांनी मात्र अवघ्या 20 वारक-यांसोबत वद्य अष्टमी ऐवजी शुद्ध दशमीला माऊलींची पालखी पंढरपूरला न्या. विठुरायाचा भक्त वारकरी यावर्षी घरूनच विठोबाचे दर्शन घेईन असा प्रस्ताव पंढरपूरच्या देवस्थानला पाठविण्यात आला.

    अद्याप अजित पवारांनी निर्णय घेतलेला नाही. तसेच संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यासंदर्भात देहू येथील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याविषयी चर्चा होणे अद्याप बाकी आहे.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here