Newasa : पंचायत समितीमध्ये राजीव गांधी अपघात योजनेच्या धनादेशांचे वाटप

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नेवासा – पंचायत समिती अंतर्गत राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रकमेच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.

इयत्ता पहिली ते बारावी या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र शासनाने राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत त्रिमूर्ती विद्यालय खडका व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलाबतपूर येथील लाभार्थी पालकांना धनादेशाचे वितरण नुकतेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगणे यांच्या हस्ते  करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती अंतर्गत सर्वच योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याबाबत सभापती कांगुंणे यांनी समाधान व्यक्त केले. नेवासा तालुक्यात शिक्षण विभागाचे काम नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे, यासाठी शिक्षण विभागाचे कौतुक केले. सर्वांनी सामाजिक अंतर पाळून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य विक्रम चौधरी, संजय खरे ,बाळासाहेब सोनवणे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, गटशिक्षणाधिकारी हेमलता गलांडे, अपंग विभागाचे मदन लाड, सचिन बेळगे, समी शेख याच बरोबर लाभार्थी पालक उपस्थित होते.
यापुढील काळात पंचायत समिती अंतर्गत शासनाच्या सर्व योजना गोरगरिब, तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील.
– रावसाहेब कांगुणे, सभापती पं.स. नेवासा

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here