Shrigonda : टाकळी ग्रामपंचायतीने टाकलेले सिमेंट बाक चोरीला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील टाकळी कडेवळीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बस स्थानक तसेच वृद्ध नागरिकांना बसण्यासाठी बऱ्याच ठिकाणी सिमेंटचे बाक टाकण्यात आले होते. मात्र, काही निष्ठुर लोकांनी त्या सिमेंटच्या बाकाची चोरी केल्याप्रकरणी गावच्या सजग नागरिकांनी ग्रामसेविका कडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी व गावातील वयोवृद्ध नागरिक यांना बसण्यासाठी सिमेंटच्या बाकाची सोय करण्यात आली होती. त्यानुसार बस स्थानक परिसर म्हणजे गावातील सर्व वडाखाली प्रत्येक ठिकाणी 2 प्रमाणे सिमेंटची बाके ठेवण्यात आली होती.

मात्र, मागील काही दिवसांपूर्वी ही बाके चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मात्र, तरीही याबाबत कोणीच काही बोलण्यास तयार नव्हते. मात्र, गावातील संदीप वाळुंज, वसंत वाळुंज तसेच अक्षय नटेश वाळुंज यांनी याबाबत ग्रामसेवक यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे संबंधित चोरावर लवकरच कारवाई होण्याची अपेक्षा वाळूंज यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामसेवक नॉटरिचेबल ?

टाकळी कडेवळीत या गावातील बस स्थानक परिसरातील सिमेंटची बाकडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसवली असल्याने आता ती चोरी गेली आहे. त्याबाबत विचारणा करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ग्रामसेविका शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन नॉटरिचेबल आढळून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here