Beed : तहसिलदार निलिमा थेऊरकर यांची बेधडक कारवाई

3

मेहकरी तलावातील अवैध पाणी उपसा करणा-यांच्या विद्यूत मोटारी जप्त

कडा – तालुक्यातील मेहकरी तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेले असतानाही सर्रास तलावातून अनधिकृत पाणी उपसा करणा-या शेतक-यांवर तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी बेधडक कारवाई केली. तसेच संबंधित शेतक-यांना अवैध पाणी उपसा न करण्याबाबत तंबी देण्यात आली आहे.

मागील वर्षी आष्टी तालुक्यात पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाल्यामुळे सीना धरणातून या मेहकरी तलावात पाणी सोडण्यात आले होते. तेच पाणी मेहकरी तलावातून तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांना टॅक्टरच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येत आहे. परंतू सध्या दुष्काळामुळे पाणीटंचाईचे चटके असह्य झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मेहकरी तलावातील पाणी उन्हाळ्यात पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
मात्र, परिसरातील काही शेतकरी आरक्षित पाण्याचा शेतीसाठी उपसा करीत असल्यामुळे तलसिलदार निलिमा थेऊरकर यांनी शुक्रवारी अंभोरा पोलिस ठाण्याचे एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे, मंडळाधिकारी गवळी यांच्यासह पथकातील इतर अधिकारी कर्मचा-यांनी मेहकरी तलावाला अचानक भेट दिली. या तलावातून अनाधिकृत पाणी उपसा करणा-या शेतक-यांच्या विद्यूत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पाणी चोरणा-या शेतक-यांना लेखी स्वरुपात सूचना करण्यात आल्या आहेत.
मेहकरी तलावातील आरक्षित पाणीसाठा हा टंचाईग्रस्त गावांच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आरक्षित पाण्याचा शेतीसाठी अवैध पाणी उपसा करु नये. नसता प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल.
– नीलिमा थेऊरकर, प्रभारी तहसीलदार आष्टी

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here