Rahuri : देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या दोन कामगारांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल; दोन्ही कामगारांना अटक

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

देवळाली प्रवरा – कोरोनो संसर्गजन्य आजार अटोक्यात ठेवण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेने नाका बंदी केली असून लाख रस्त्यावरील नाका बंदीच्या ठिकाणावरील झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्यावरुन नगर पालिकेच्या दोन कामगारांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कामगारांना अटक करण्यात आली आहे. पालिका कामगारांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा नगर पालिकेने विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. लाख रस्ता या ठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी ठिकाणी झोपडपट्टी आहे. येथील एक महिला शेतमजुरीसाठी जाते. ती कामावरुन घरी येत असताना या नाक्यावरील नगरपालिका कामगार नंदू रत्नाकर शिरसाठ व दत्ताञय मुक्ताजी मोरे या दोघांनी गेल्या काही दिवसापासून अश्लील भाषा वापरुन छेड काढीत होते. शुक्रवार दि.15 रोजी सायंकाळी 5;30 वाजता सदर महिला शेतमजूरी करुन घरी आली असता घरा समोर हातपाय धूत असताना नंदु शिरसाठ हा फिर्यादी महिलेस तुझा पाय वाकडा पडत आहे. असे म्हणला असता तू असे का बोलतोस, अशी विचारणा केली असता. नगर पालिकेच्या दोन्ही कामगारांनी फिर्यादी महिलेस मारहाण करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. सदर महिलेने या दोघां विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात विनयभंगाची कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यातील दत्ताञय मोरे हा कर्मचारी यास देवळाली प्रवरा विटभट्टी नाकाबंदीच्या ठिकाणी 2 ते 5 नाकाबंदीसाठी नेमणूक केलेली आहे. या ठिकाणावरील नाकाबंदी संपवून तो लाख रस्त्यावरील नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन बसत होता. अनेक दिवसापासून छेड काढण्याचा प्रकार चालू होता. शुक्रवारी (दि.15) लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. हा सर्व प्रकार फिर्यादी महिलेने घरी सांगितला घरच्यांनी पोलिस ठाणे गाठवून फिर्याद दाखल केली. गुन्हा रं. नं. 353/20 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून नगर पालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी मोठे प्रयत्न केले. परंतू त्यांना यश आले नाही.

जातीय तेढ नको….

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या दोन कामगारांनी दलित महिलेचा विनयभंग केला. या महिलेने फिर्याद देताना जाती वाचक शिविगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला होता. परंतू मी स्वतः हस्तक्षेप करुन फिर्यादी महिलेस तुला जातीवर शिवीगाळ केलेली नाही. तर जाती वाचक शिवीगाळ करण्याचा खोटा गुन्हा दाखल कशासाठी करताय. यामुळे देवळाली प्रवरात जातीय तेढ निर्माण होईल. फिर्यादी महिलेने जाती वाचक शिवीगाळ करण्याचा गुन्हा दाखल न करता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. नगराध्यक्ष या दोन्ही कामगारांना पाठीशी घालीत आहे, असे आर.पी.आयचे उत्तर जिल्हा प्रमुख सुरेंद्र थोरात यांनी सांगितले.

त्यांची चौकशी करुन कारवाई

नगर पालिकेचे कामगार दत्ताञय मोरे, नंदु शिरसाठ या दोघां विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दोघांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या दोन्हा कामगारांची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल. असे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here