Shirdi : साठ दिवसात बाबांच्या झोळीत ०३ कोटी २२ लाख दान

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिर्डी – कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे दिनांक १७ मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले असतानाही दिनांक १७ मार्च ते दिनांक १६ मे २०२० अशा ६० दिवसाच्‍या कालावधीत २१ हजार ६४९ साई भक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे ०३ कोटी २२ लाख १० हजार २४७ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभर खळबळ उडाली आहे. प्रगत देशांनीही या साथीमुळे आपले हात टेकले आहे. त्यामुळे पर्यटन आणि तिर्थक्षेत्रावर या साथीचा प्रतिकूल परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिर्डीचे साईबाबा मंदिरही त्याला अपवाद नाही. साईभक्त येण्यापासून सरकारने रोखल्याने हा प्रतिकूल परिणाम झाला आहे. मात्र, साई भक्तांचा जीव महत्वाचा असल्याने हा अप्रिय निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here