Karjat : लॉकडाऊन काळातील शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे खोली भाडे माफ करावे – शुभम वहिल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १६

कर्जत :   ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी गेलेले विद्यार्थी आपल्या गावी दोन महिन्यापासून आहेत. त्या विद्यार्थ्यांचे खोली भाडे माफ करावे. तसेच एसटी महामंडळाच्या बसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक महिन्याचा वाया गेलेला पास त्या॑ना परत मिळावा अशी मागणी मिरजगाव येथील मात्र सध्या पुण्यात शिकत असलेलेला विद्यार्थी शुभम वहिल याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. मात्र त्या अगोदर पुणे मुंबई नाशिक व इतर शहरातील विविध शाखांमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थीवर्ग आपापल्या गावी परतले आहेत. यातील बरेचसे विद्यार्थी हे शेतकरी मजूर गरीब कुटुंबातील आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे पालक कोरोना लॉकडाऊनमुळे घरीच आहेत. या काळात त्या कुटुंबाना कसलाही रोजगार उपलब्ध नाही. यासह सध्याची परिस्थिती पाहता शेतमालाला भाव नाहीत त्यामुळे या सर्वच वर्गाचे आर्थिक उत्पन्न शून्य आहे. यामुळे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत.

अशातच शहरात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या खोली मालकानी भाडे मागण्याचा तगादा लावण्यास सुरुवात केली आहे. आधीच मेटाकुटीस आलेला शेतकरी वर्ग यामुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे खोली भाडे शासनाने संबंधित मालकांना सांगून माफ करावे. तसेच जे विद्यार्थी होस्टेलमध्ये राहत आहेत त्यांना पुढील वर्षात त्या प्रमाणात सूट द्यावी. यासह लॉकडाऊन काळातील वाया गेलेले विद्यार्थ्यांचे एस टी पास शाळा सुरु झाल्यान॑तर विनामूल्य परत करत विद्यार्थ्यांची परिक्षा फी माफ करावी. तसेच आगामी वर्षांची शैक्षणिक फी माफ करावी, अशी मागणी शुभम वहील याने मूख्यम॑त्र्या॑ना निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रहमनिर्माण म॑त्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांना दिल्या आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here