Nirmala Sitharaman Live : ऑनलाईन शिक्षणासाठी वन नेशन, वन डिजिटल Platform, तर टीव्हीवर वन क्लास वन channel

प्रतिनिधी राष्ट्र सह्याद्री

Nirmala Sitharaman Live | ऑनलाईन शिक्षणासाठी वन नेशन, वन डिजिटल Platform, तर टीव्हीवर वन क्लास वन channel, बारावीपर्यंत प्रत्येक इयत्तेसाठी एक ऑनलाईन वर्ग, विद्यार्थ्यांना मानसिक आधारही देणार, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजच्या विश्लेषणविषयक आज आणखी एक पत्रकार परिषद निर्मला सितारमण घेत आहेत. यामध्ये कालपर्यंत निर्मला सीतारमन यांनी काल कोळसा, खनिजक्षेत्र, संरक्षण उत्पादने, विमानतळे, हवाईहद्द व्यवस्थापन, दुरुस्ती, अवकाश, ऊर्जा पारेषण कंपन्या आणि अणुऊर्जा या आठ क्षेत्रांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. संरक्षण क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 49 टक्क्यांवरुन 74 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. देशात तयार होणाऱ्या शस्त्रांचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे. तसेच काही संरक्षण साहित्याची आयात रोखणार आहे.

आजची सीतारमन यांची पाचवी पत्रकार परिषद असून शिक्षण क्षेत्र, एमएसएमई क्षेत्राविषयी महत्वपूर्ण घोषणा सीतारमन यांनी केल्या आहेत. तसेच राज्यांना वेळेवर रेव्हेन्यू ग्रॅन्ट देण्यात आले आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले. तर शिक्षण क्षेत्राविषयी महत्वपूर्ण घोषणा करून देशात एकच डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे, असेही त्यांनी घोषित केले.

‘कोविड’ निगडीत कर्जे ‘डीफॉल्ट’ प्रकारात समाविष्ट नसतील, 1 कोटीपर्यंतच्या चुकांसाठी कंपन्यांवर खटले नाही, दिवाळखोरीची मर्यादा एक कोटीवर नेल्याने सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना दिलासा सात नियमांना अपराधिक श्रेणीतून वगळणार

कोविड’ काळात झालेली कर्जे ‘डीफॉल्ट’ प्रकारात समाविष्ट केली जाणार नाहीत, असेही अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले आहेत.

# एक देश एक रेशनकार्ड योजनेची तातडीने अंमलबजावणी होणार आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here