Ajnuj : छत्तीसगड येथील वीस कामगार अजनूज येथून रवाना

शिव उत्सव समितीचे भरत गिरमकर यांच्या विशेष प्रयत्नातून यश

अजनूज – श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथे छत्तीसगड येथील २० कामगार आले होते. त्यातील काही गवंडी काम करत होते. तर काही मजुरी करणारे होते. पण कोरोना प्रादुर्भावामुळे भारत सरकारने लाॅक डाऊन सुरु केले. त्यामुळे या कामगारांना आपल्या गावी जाता येईना. हे अडकून पडलेल्या कामगारांना अजनूज शिव उत्सव समितीचे भरत गिरमकर यांनी मदत करून ग्रामसेवक नवनाथ गोरे व गावचे तलाठी यांच्या सहकार्याने त्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना पिकअपच्या साह्याने श्रीगोंदा बसस्थानकावर सोडविण्यात आले.

ज्यावेळी गावातून निरोप देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्यांना पाण्याच्या बाटल्या व नाष्टा, काही प्रमाणात खाऊ देऊन निरोप दिला. गावाकडच्या माणसांमध्ये किती माणुसकी आहे. याचे दर्शन आम्हाला आज घडून आले. त्यात भरत साहेबा सारखा देवमाणूस भेटला. त्यामुळे आम्हाला आज गावचा रस्ता दिसत होता. त्यांनी शिव उत्सव समितीचे आभार मानले. भरत गिरमकर हा युवक नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असतात त्याचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here