Shevgaon : मुळा पाटपाण्यावरून राजकारण शिगेला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | दीपक खोसे

ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील मुळापाटपाणी राजकारण दिवसेंदिवस शिगेला पोहोचले असून हे पाटपाणी राजकारण केव्हा थांबणार की या धूर्त राजकारणामुळे निष्पाप बळीराजाचा बळी जाणार ही बाब भविष्यकाळात महत्वाची ठरणारी आहे.

शेवगांव तालुक्यातील शेतक-यांना हक्काचे पाणी मिळाले असते मात्र धूर्त राजकारण प्रबळ ईच्छाशक्ती नसल्याने कोपरे धरण राजकीय आकसापोटी न झाल्याने जायकवाडीचे तरी पाणी आपल्या शेतीला मुबलक पाटपाणी मिळेल. या आशेवर शेतक-यांनी आपल्या जमिनी धरणासाठी दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात या धरणांचा लाभ आजही आपल्यापेक्षा मराठवाड्यालाच होत आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन त्यावेळी शेतक-यांना पाण्याचा लाभ मिळावा यासाठी ताजनापूर लिक्ट योजनांची आखणी ख-या अर्थाने करण्यात आली. सुरूवातीला कोट्यावधी रूपये खर्च करून ही योजना किमान गतीमान झाली. मात्र, पुन्हा २०१४ साली सरकार बदल्यामुळे त्यात निधी मिळण्यास‌ काही अडचणी येत असल्यामुळे काम थप्प धिम्या गतीने सुरू होते.

शेवगांव तालुक्यातील शेतक-यांना मुळा धरण हे जलसंजीनी असून पूर्ण भागात मुळाचे पाटपाणी जाते पूर्वीच्या काळी कोपरे धरणासाठी कित्येक आंदोलने झाली. मात्र, धरण त्यावेळी राजकीय हस्तक्षेपामुळे होऊ शकले नाही. तेव्हा या भागातील व तालुक्यातील वंचित शेतक-यांना मुळाच्या पाटपाण्यावर हक्क देण्यात आला. सुरूवातीला पूर्ण शेवगांव तालुका लाभार्थी गावांमध्ये पूर्ण दाबाने पाणी मिळत असे पर्जन्यमान चांगले होते. मात्र, मागील १५ /२० वर्षात पावसाचे जीवनमान बदलल्याने पाटपाण्यासाठी शेवगांव तालुक्याला मोठा संघर्ष करावा लागत आहे. आजही पाथर्डी तालुक्यात पाटपाणी पूर्णदाबाने मिळत असतानाही शेवगांव तालुक्याला का वंचित ठेवले जात आहे, ही मोठी शोकांतिका आहे.

टेल टू हेड पाटपाणी देण्याची भूमिका काही काळ घेतली असली तरी आज मात्र शेवगांव तालुक्यातील शेतक-यांना मुळाच्या पाटपाण्यापासून जाणून बुजून डावलले जात तर नाहीये का वंचित राहण्याची वेळ आली हा न कळणारा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजकारण हे स्वत:पुरते मर्यादित ठेवून शेतक-या प्रती आपली भूमिका मांडून त्यांना या दुष्काळी परीस्थितीत पाटपाणी मिळणे गरजेचे असताना तसे न होता पाटपाणी प्रश्नावर आता राजकारण करण्यावर सध्या राजकारणी जोर देत असताना त्यामध्ये नाहक शेतक-यांचा बळी जाणार आहे.

चालू आर्थिक वर्षात पाटपाण्यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधींचे कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात उपोषण करण्याची वेळ येत असल्याने कोणाला दाद मागायची हा प्रश्नच आहे. आजही भातकुडगांव मळेगांव सामनगांव आव्हाणे, ढोरजळगांव, अमरापूर, शहरटाकळी आदीसह या टेलच्या भागातील शेतकरी पाटपाण्यासाठी वेळोवेळी उपोषणे करत असताना त्याचे राजकारण्यांना काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.

यावर्षीचे उन्हाळी आवर्तन सुटून किमान महिना उलटून गेला तरी काही भागांना अजूनही पाटपाणी मिळालेच नाही प्रत्यक्षात करोनाचा प्रसार वाढत असताना पिके जळून गेली असली तरी आमच्या बळीराजाला दाद कोणाकडे मागावा हा मोठ्या प्रश्नाने पिके पूर्णपणे भूईसपाट झाली असून पाटबंधारे विभागाच्या कर्मचा-यांना मनमानी कारभाराचा दाद तरी कोणाला मागावा हा प्रश्नच मोठा आहे.

आज कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वसामन्य जनता व शेतकरी हवालदिल झाले असताना राजकारणी आपल्या समाजकारणाची जाणीव करून देऊन काय साध्य करणार ही मोठी शोकांतिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here