Shirdi : काकडी विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करा – आमदार आशुतोष काळे

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

शिर्डी : आज आमदार आशुतोष काळे यांनी काकडी विमानतळ येथे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी काकडी विमानतळावरून कार्गो सेवेसाठी स्वतंत्र कार्गो टर्मिनल सुरू करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा लवकरात लवकर करण्यात यावा, यासह वेगवेगळ्या सूचना दिल्या.

यामध्ये विमानतळ ते शिर्डी मार्गावर पथदिवे बसवण्यात यावे, प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळावर स्क्रिनिंग मशीन वाढवण्यात यावे, सिक्युरिटी व ग्रास कटिंग कामगारांचे पगार वेळेवर देण्यात यावे. तसेच याआधी चर्चा झाल्याप्रमाणे विमान प्राधिकरणाने काकडी गावाला पाणीपुरवठा करावा, रन वे वरून वाहून जाणारे पाणी शेतकऱ्यांना देण्यात यावे आदी सूचना यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर विमान वाहतूक सुरू होईल. तेव्हा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा केली व सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला.

यावेळी टर्मिनल व्यवस्थापक एस. मुरलीकृष्णन, साहाय्यक कार्यकारी अभियंता कौस्तुभ ससाणे, इतर अधिकारी व स्थानिक कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here