Karjat : झारखंड-छत्तीसगड राज्यातील कामगार एसटीने स्वगृही रवाना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १७

कर्जत : कर्जत तालुक्यात झारखंड-छत्तीसगड राज्यातील सुमारे २५ कामगार शनिवार (दि १६) दुपारी आपल्या गावाकडे कर्जत महसूल प्रशासनाने रवाना केले आहेत. यावेळी कर्जत तालुक्यात काम करताना आलेला अनुभव तसेच कोरोना लॉकडाऊन काळात कर्जतकरांनी दिलेले प्रेम पाहून कामगारांना गहिवरून आले होते.

कोरोनामुळे सर्वच स्तरातील लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबाची मोठी परवड झाली. अनेक राज्यातून कर्जत शहर आणि तालुक्यात आलेल्या कामगार आणि मजूर लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसला. कामाच्या शोधात अनेक गरीब आणि गरजवंत मजूर आणि कामगारांना आपले राज्य सोडून कर्जत तालुक्यात वास्तव्य करावे लागले होते.

मात्र, कोरोनाच्यामुळे सर्वच व्यवसाय आणि मजुरी बंद झाल्याने हे कामगार हवालदिल झाले होते. त्यातच दिवसा-दिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कामगारांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यास कर्जत तालुका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करीत कागदोपत्री सर्व प्रक्रिया पार पाडत काल दुपारी झारखंड राज्यातील तब्बल २५ कामगारांना सुखरूप नागपुरमार्गे गोंदियातील देवरी (छत्तीसगड सीमेलगत) रवाना केले. यावेळी या सर्व कामगारांना प्रवासात जेवण आणि अल्पोहाराची सुविधा महसूल प्रशासनाने करीत दिलासा दिला.

याप्रसंगी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार सी एम वाघ, नायब तहसिलदार सुरेश वाघचौरे, मनोज भोसेकर, प्रकाश मोरे यांच्यासह रमेश कांबळे, परमेश्वर ठोकळ, तलाठी सुनील हासबे, विश्वजीत चौगुले, कालीचरण मखरे, जितेंद्र गाढवे, चालक प्रकाश नेटके, श्रीगोंदा एसटी विभागाचे प्रवीण शिंदे, दरेकर यांच्यासह एसटी चालक आर डी कुलांगे आणि ए के शेलार उपस्थित होते. कर्जतहून निरोप घेताना अक्षरशः कामगारांना गहिवरून आले होते. यापूर्वी मागील आठवड्यात कर्जत तालुक्यातील उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यातील कामगारांना रेल्वेद्वारे रवाना केले होते.

मागील तीन ते चार दिवसापासून कर्जत तहसील कार्यालयात आम्हा सर्वांना रवाना करण्याची प्रक्रिया सुरू होती. या काळात कर्जत प्रशासनाने यासर्व मजुरांची जेवण, अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली होती. त्याबद्दल मंगलू निषाद या कामगाराने प्रशासनाचे आभार मानले. ज्यावेळी त्यांनी कर्जत तहसील कार्यालयातून निरोप घेतला. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. “साहब आपने हमारी बहुत मदद की है, हम आपको और कर्जत के लोगो को कभी नही भुलेंगे असे म्हणत एसटीत प्रवेश केला.”

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here