प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी काल झालेल्या वादळी वाऱ्यात वीज पडून एक बैल जागीच ठार झाला आहे.
तालुक्यातील टाकळी कडेवळीत याठिकाणी प्रल्हाद सोपान वाळूंज हे शेती करून आपली उपजीविका भागवतात. मात्र, शनिवारी झालेल्या सोसाट्याच्या वार्यात त्यांच्या घराजवळील चिंचेच्या झाडाला बांधलेल्या एका बैलाच्या अंगावर वीज कोसळून बैल जागीच ठार झाला आहे. याप्रकरणी तालुक्याचे पशुधन वैद्यकीय अधिकारी कळमकर व घोडके यांनी पोस्टमार्टम करून अहवाल सादर केला आहे.