Mumbai : कोरोना विषाणूच्या निर्मितीबाबत चीनविरोधात दावा

1

मुंबईच्या वकिलांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

नगरः चीनमध्ये कृत्रिक कोरोना विषाणूची निर्मिती करून जगात करून नरसंहार केला. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण केल्यामुळे चीन व त्या राष्ट्राचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात अॅड. रावसाहेब अनर्थे यांनी फाैजदारी दावा दाखल केला आहे.

चीन हा देश शस्त्रास्त्र स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळी अस्त्रे निर्माण करतो. जागतिक बाजारपेठ काबीज करून जगावर राजकीय सामरिक दबाव वाढवित आहे. बलाढ्य राष्ट्र निर्माण करणे हा चीनचा हेतू आहे. त्याचाच भाग म्हणून कोरोनासारखे जैविक आयुध निर्माण करून

ते जगातील मानवी संहारासाठी वापरलेले आहे, असे या दाव्यात म्हटले आहे. चीनने जाणीवपुर्वक या विषाणूवद्दलची माहिती जगापासून लपवून ठेवली. चीनमधे १७ नोव्हेंबर २०१९ रोजी

हुवेई प्रांतामधील ‘बुहान येथे या विपाणूचा शिकार झालेला रोगी आढळून आला. यानंतर  ३१ डिसेंबर २०१९ रोजी पाच रूग्ण आढळून आले. ‘ली वेनलियान या डॉक्टरने त्याचे ‘वेईवो या ‘सोशल मीडिया’वर या विषाणूविषयी लिहिले आहे. त्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. चीनमध्ये कोगेनाचे प्रमाण वाढत गेले. आंतराष्ट्रीय आरोग्य अधिनियम २0०५’ चे कलम सहा

नुसार माहिती देणे वंधनकारक असताना चीनने मुद्दामहुन कोरोनाबावतची माहिती लपवून

ठेवली. याबाबतचे अवहाल २४ तासात जागतिक आरोग्य संघटनेस देणेवंधनकारक आहे. याबाबत पुराबे सादर न करता नष्ट करण्याचा पयत्न केला, असा आरोप आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात करण्यात आला आहे.

कोरोना आजारामुळे आत्महत्या, भूकबळी, कुपोषण झाले.  कोरोनामुळे जगभर टाळेबंदी जाहीर करावी लागली. त्याचा परिणाम व्यापारी, व्यावसायिक प्रभावीत झाले आहेत.  समाजजीवनावरही कोरोनाचा परिणाम झालेला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा कोरोनामुळे वळी गेला व कधीही न भरून येणारे नुकसान झाले. बेरोजगारी वाढली. शेती व शेतीपूरक उद्योगाला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. जागतिक कामगार संघटनांनुसार सुमारे ३७.0५ टक्के जागतिक रोजगार नष्ट झाला आहे. जागतिक सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन

संघटनेनुसार ९६ टक्के जागतिक पर्यटन व वारसा ठिकाणे बंद असल्यामुळे या क्षेत्रावर

उपायोजिका करणारे समारे ७५ अब्ज नोकर मजूर प्रभावित झाले आहेत. २.१ अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागत आहे. या सर्वाला चीन जबाबदार असून सर्वांचे नुकसान भरून देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

चीनविरोधात जगातला पहिला दावा

आंतरराष्ट्रीय फाैजदारी न्यायालयात कोरोनाबाबत चीनविरोधात दाखल झालेला हा पहिलाच दावा आहे. चीन पाकिस्तानला मदत करून भारताच्या हिताला बाधा पोचवितो आहे. भारताच्या विरोधात कारवाया चालूच असतात. भारताचा झपाटयाने होणार विकास व प्रभाव चीनपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे चीनने जाणीवपूर्वक भारताला शह देण्यासाठी ही व्यूहनीती आखली असल्याचा आरोप चीनने केला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here