Shrigonda : घोडेगाव रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी मातीत जाण्याची शक्यता

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

घोडेगाव – येथील रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी या कामाची माहिती देऊन सुद्धा या कामाचा दर्जा सुधारण्यात आलेला नाही, असे सुजाण नागरिक बोलताना दिसत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा घोडेगाव रस्ता डांबरीकरण करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी टाकला गेला आहे. त्यातून याा रस्त्याचे काम चालू आहे. तर रस्त्यावर आतापासूनच खड्डे होत आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. अंदाज पत्रकाप्रमाणे काम न करता अधिकाऱ्यांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करण्यात येत आहे, अर्थात थुका पॉलिश काम करण्यात येत आहे.

या आधीही या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. काही नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने काम थांबविले होते. परंतु त्या कामात सुधार न करता “चांगलं काम करण्यास लावणारे तुम्ही कोण? ” म्हणून गावकऱ्यांना धमक्या देऊन ठेकेदाराने ते काम पूर्ण केले होते. परंतु तो रस्ता 6 महिन्याच्या आतच खड्डेमय झाला आहे. त्या रस्त्याची चौकशी करण्याची मागण होत आहे.

मागील ठेकेदाराप्रमाणे आताही तसेच काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याचे भविष्य धोक्यात आहे. कोट्यावधीचा निधी मातीत जाईल, असे सांगणा-या प्रवाशाला ओरडले जात आहे. गुंडांसारखी भाषा वापरणा-या ठेकेदारांना अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्यास सांगणारा कोणीच वरिष्ठ नेता जनप्रतिनिधी पुढे येत नसल्याने निकृष्ट दर्जाचे काम जोरात सुरू आहे. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची जो प्रवसी सूचना देतो त्यालाच शिवीगाळ करून धमकावण्याचे प्रकार सध्या सुरू आहे.

या बाबत बांधकाम विभागच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कामात सुधार करण्यात आलेला नाही. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाकडे लक्ष देऊन पुन्हा अंदाज पत्रकाप्रमाणे काम करुन घ्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here