Karjat : तालुका पत्रकार संघाच्या वतीने मोफत अल्पोहार केंद्रास धान्य वितरण

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १८

कर्जत : कर्जत तालुका पत्रकार संघाच्यावतीने कर्जत शहरात सावता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मनीषा सोनमाळी यांनी सुरू केलेल्या मोफत अल्पोहारास आठ पोती गहू आणि तांदूळ देण्यात आले. यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात दवाखाना आणि बँकेच्या कामकाजासाठी येणाऱ्याची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच दुकाने बंद असल्याने त्यांची खाण्या-पिण्याची मोठी गैरसोय होत आहे. याच अनुषंगाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सावता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मनीषा सोनमाळी यांनी मोफत अल्पोहार केंद्र सुरू केले होते. या केंद्रातून अनेक गरजवंत कुटुंब आणि नागरिक आपली भूक भागवत आहे. याच सामाजिक जाणिवेतून सोमवार दि १७ रोजी कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने अल्पोहार केंद्रास आठ पोती गहू आणि तांदूळ वितरण करण्यात आले.

यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना पठाण, उपाध्यक्ष मोतीराम शिंदे, सचिव मच्छिंद्र अनारसे, कार्याध्यक्ष निलेश दिवटे, खजिनदार डॉ. अफरोजखान पठाण, सल्लागार गणेश जेवरे, सुभाष माळवे, आशिष बोरा, केंद्रचालक तथा सावता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा नगरसेविका मनीषा सोनमाळी, सचिन सोनमाळी, अंकुश भोज आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रचालिका तथा नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक गरीब आणि गरजवंत कुटुंबाचे मोठी परवड होत आहे. याच सामाजिक जाणिवेतून आपण मोफत अल्पोहार सुरू केले होते. आज कर्जत तालुका पत्रकार संघाच्या सर्वच पदाधिकारी यांनी मोफत धान्य दिल्याने मोठा आधार आणि दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल कर्जत तालुका पत्रकार संघाच्या सर्वच पदाधिका-याचे आभार मानत धन्यवाद दिले.

सध्या कोरोनाच्या अनुषंगाने शहरातील अनेक दुकाने, हॉटेल्स यासह आदी दुकाने बंद आहेत. आवश्यक कामासाठी सर्वसामान्य नागरिक, परप्रांतीय मजुर बाहेर पडत. शहरात सोनमाली यांचे मोफत अल्पोहार केंद्र सुरू आहे. त्याचा मोठा आधार त्यांना मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुका पत्रकार संघाच्या सर्वच पदाधिकारी यांनी केंद्रास मदत देण्याचा विचार केला होता. त्याप्रमाणे आज गहू आणि तांदूळ यांची आठ पोती केंद्रास देण्यात आले. त्याबद्दल तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार.
 – मुन्ना पठाण, अध्यक्ष- कर्जत तालुका पत्रकार संघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here