Akole : दारूच्या नशेत एकुलत्या एक मुलाने घेतला वडिलांचा बळी 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
अकोले – दारूच्या नशेत असलेल्या मुलाला दारु पिऊ नको म्हटल्याने मुलाने बापाला लाथा बुक्क्याने मारहाण करत जिवे ठार मारल्याची घटना तालुक्यातील बोरी गावात घडली.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की तालुक्यातील बोरी गावात राहणारे भागवत गोमा कांबळे (वय ६५ वर्षे) यांचा मुलगा राजेंद्र कांबळे दारूच्या नशेच्या आहारी गेलेला असल्याने त्याची पत्नी त्याच्या ञासाला कंटाळून माहेरी गेलेली आहे. आज रविवारी दुपारी ३ते४ दरम्यान आरोपी मुलगा राजेंद्र कांबळे दारुच्या नशेत धुंद असताना त्याचे वृद्ध वडील भागवत गोमा कांबळे दारु पिऊ नको याबाबत समजवत असताना आरोपी राजेंद्र कांबळे याने बापाला लाथा बुक्क्याने जबर मारहाण केली.

या मारहाणीत वडील भागवत कांबळे यांचा मृत्यू झाला. राञी उशिरा कोतुळ ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन उशिरापर्यंत अकोले पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here