Shrigonda : तलवार बाळगल्या प्रकरणी दोन युवकांवर गुन्हा

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तलवार बाळगल्या प्रकरणी दोन युवकांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय मच्छिद्र मेहेत्रे (रा.मेहेत्रेवस्ती औटेवाडी ता.श्रीगोंदा) व आदिनाथ छगन हिरडे, (रा. हिरडेमळा औटेवाडीजवळ श्रीगोंदा), असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक डी. एस. जाधव यांनी पोलीस नाईक व्ही.आर.वैराळ, पो.कॉ. एस.बी.कोतकर व पो.कॉ. आर.बी.भोर यांना रविवारी (दि.१७ मे) पावणेबाराच्या सुमारास दोन इसम हे त्यांचे मोटार सायकल एम.एच. १६ सी.आर. ५४९८ वर बसून जवळ तलवार बाळगून, घोडेगाव रोडने श्रीगोंदाकडे येत आहेत. तेव्हा पोलीस नाईक वैराळ यांनी तातडीने कारवाई करत दोन पंच व पोलीस पथक रवाना केले.

घोडेगाव रोडने जातांना, महाराजा टिंबर या प्लायवूड दुकानासमोर रोडवर एम.एच.१६ सी आर ५४९८ या मोटार सायकलजवळ दोन इसम उभे होते. पंच व पोलिसांची खात्री होताच, पोलिसांनी १२:३० वा. छापा टाकला. आरोपी पोलिसांना पाहून पळू लागले, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. या ठिकाणी या ईसमांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, आदिनाथ छगन हिरडे याच्या पाठीवर शर्टच्या आतील बाजूस एक लोखंडी तलवार मिळून आली आहे. ही तलवार उमेश वेताळ (पुर्ण नाव माहीत नाही) रा. लिपंणगाव ता. श्रीगोंदा याची असून, त्याने आमच्याकडे दिली होती. आज रोजी परत मागितली असल्याने, त्यास देण्यास चाललो असल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल आदिनाथ छगन हिरडे याने स्वतःची असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी २०० रुपये किमतीची लोखंडी तलवार व ५० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन गाडी ताब्यात घेत, आरोपीं विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यात यापूर्वी ही अनधिकृत शस्त्र बाळगल्या प्रकरणी काही इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, तलवार ही लग्नसमारंभ, वाढदिवस यात वापरण्याची चालरीत असल्याचे त्यावेळी बोलले होते. मात्र, आत्ता लॉकडाऊन असल्याने कोठेही लग्नसोहळा होताना दिसत नाहीत. तर या बहाद्दरांनी नेमकी कशासाठी तलवार आणली होती? हे तपासात निष्पन्न होईलच. तलवार व गावठी कट्टा वापरल्या प्रकरणी तत्कालीन सिंघम पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तपासाची चक्रे फिरवित विहिरीतून पिस्तुल बाहेर काढल्याचे तालुक्याला माहीत आहे. तसेच, त्यांची दबंग कारवाईही सर्वांना माहीत आहे. बऱ्याच कालखंडानंतर आज तलवार प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले असून, तपास चक्र कोठे जाऊन पोहोचतात ? हे सर्वांना लवकरच समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here