Shrigonda : निमगाव खलू व गार कंटेन्मेंट झोन तर कौठा बफर झोन; परिसर 14 दिवसांसाठी लॉक 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – दौंड शहरात ३२ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किमी अंतरातील कंटेनमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये आले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी १४ दिवस हा परिसर लाॅक करण्यात आला आहे.
दौंड शहरात आठ कोरोना बाधित रुग्ण सापडले. त्यावेळी श्रीगोंद्यातील गार व निमगाव खलू ही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. ही गावे दौड शहरापासून तीन किमी अंतरावर असल्याने हायरिक्स म्हणून ही निमगाव खलू व गार ही कंटेन्मेंट झोनमध्ये तर दौड शहरापासून पाच किमी आतील कौठा हे बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांच्या सीमा लाॅक करण्यात आल्या आहेत.
श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली केली आहे. आरोग्य महसूल पोलीसचे कर्मचारी तीन गावात तळ ठोकून आहेत. कौठा खोरवडी बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद, गार दौड ही नावेची वाहतूक बंद, दौंडला कोणत्याच कामासाठी जाऊ नये, अशी दवंडी देण्यात आली. काष्टी श्रीगोंदा येथील डॉक्टरांनी दौंडला रुग्ण पाठवू नये. चेक पोस्टवर कडक तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच घराच्या कोणी पडू नये, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या.

निमगाव खलु व गार या दोन गावांचा परिसर १४ दिवसासाठी लाॅक करण्यात आले आहे. या गावातील नागरिकांना बाहेर जाता येणार नाही, बाहेरील नागरिकांना या गावात जाता येणार नाही. तसेच सेवा भावी संस्थांचे पदाधिकारी व्यक्ती थेट मदत घेऊन जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. सर्व प्रकाराची मदत प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. सेवाभावी संस्थांनी मदत तहसीलदारांकडे जमा करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here