Shevgaon : ढोरजळगांव येथील बंधा-यांची मालिका बनलेत शोभेची वास्तू

प्रतिनिधी | शेवगाव

ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव येथील बंधा-यांची मालिका शोभेची वास्तू बनल्या आहेत. पाटपाणी सोडण्यासाठी शेतक-यांचा आटापिटा सुरू आहे. मात्र, लोकप्रतिनिधींची चुप्पीची भूमिका शेतक-यांसाठी चिंतेचा विषय बनवली आहे. पाणी सोडण्याची मागणी करूनही ढोरजळगांव येथील शेतक-यांना कोणी वाली राहिला नाही, अशी परीस्थिती परिसरात निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.

शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव येथील ढोरा नदीवर तत्कालीन आमदार व विद्यमान आमदार यांनी ढोरजळगांव येथील शेतक-यांना मुळा धरणाचे हक्काचे पाटपाणी मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन कोट्यावधी रूपये खर्चून मनो-यागत बंधारे बांधले खरे. या बंधा-यांच्या आशेवर कित्येक शेतक-यांनी ऊस शेतीवर भरही दिला. मात्र, आज तोंडघशी आलेला घास हिराऊन जाणार असून राजकीय हस्तक्षेपामुळे पाटपाणी ढोरानदीतील बंधा-यात न सोडल्यामुळे शेतक-यांची पिके पूर्णपणे भूईसपाट होऊ लागली आहे. उभ्या पिकांत आज शेतक-यांना नांगर घालण्याची वेळ आली आहे.

शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव परीसरातील नदीकाठच्या विहिरींनी या पूर्वीच तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. कमीत कमी रोटेशन सुटून एक महिना उलटून गेला असला तरी या परीसरात पिण्याच्या पाण्यासाठी नदीला पाटपाणी सोडण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे असताना मात्र, त्याकडे पूर्णपणे डोळेझाक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here