Shevgaon : आमदार मोनिका राजळे यांच्याकडून वैद्यकीय साहित्य व स्वसंरक्षण उपकरणाचे वितरण व पाणी पुरवठा आढवा बैठक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शेवगाव – आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत शेवगाव तालुक्यात ग्रामीण रूग्णालय शेवगांव व बोधेगांव, तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालयीन कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद स्वच्छता कर्मचारी, पोलिस स्टेशन यांना फेस मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, N95 मास्क,  PPE KIT, या साहित्याचे वाटप करण्यात आले.
मतदार संघातील पाथर्डी तालुक्यात संबंधित यंत्रणेला या साहित्याचे यापूर्वीच वितरण करण्यात आले आहे. शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव, भातकुडगांव, दहिगांवने, घोटण, चापडगांव, बोधेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व या अंतर्गतचे उपकेंद्र मधील वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनाही फेस मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, N95 मास्क,  PPE KIT, चे वाटप करण्यात येत आहे.
आरोग्य विभाग, पोलिस दल, महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी, आशा स्वयंसेविका या कोरोना साथीच्या कठीण परिस्थितीत जिवाची बाजी लावून काम करीत आहेत. यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा विषय महत्वाचा असल्याने आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या सुरक्षा साहित्याचे व वैद्यकीय सामग्रीचे वितरण केले. यावेळी शेवगांव येथील ग्रामीण रूग्णालयासाठी ECG  मशीन देण्यात आले. यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रामेश्वर काटे, तालुका आरोग्य अधिकारी सलमा हिराणी उपस्थित होत्या. त्यानंतर शेवगांव तहसिल कार्यालय येथे तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत साहित्य वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी शेवगांव नगरपरिषद व ग्रामीण भाागातील पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक घेतली, शेवगांव नगरपरिषदे अंतर्गत पाणी पुरवठ्यामध्ये अडचणी असुन वितरण व्यवस्थेतील दोषामुळे नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने व लॉकऊनच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे, यावर उपाययोजना करणेसाठी आमदार मोनिका राजळे यांनी तहसिलदार मयुर बेरड, गटविकास अधिकारी महेश डोके, मुख्याधिकारी आंबादास गर्कळ, पंचायत समितीचे पाणी पुरवठा अभियंता अनिल सानप, महावितरणचे उपअभियंता अतुल लोहारे, शेवगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांचे उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वेळेत होणेसाठी उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना दिल्या. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, पोलिस निरीक्षक राम ढिकले, भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापुसाहेब भोसले, बापुसाहेब पाटेकर, शहाराध्यक्ष रवींद्र सुरवसे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक कमलेश गांधी, गणेश कोरडे, अशोक आहुजा, सुनिल रासणे, शब्बीर शेख, विनोद मोहिते, नितीन दहिवाळकर, दिगांबर काथवटे, बंडूशेट रासणे, नितीन फुंदे, किरण काथवटे, नितीन मालानी, जलील राजे हे उपस्थित होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here