Shrigonda : शेतक-यावर वांगी फेकून देण्याची दुर्दैवी वेळ

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – देशात चौथे लॉकडाऊन सुरु झाले आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त फटका हा फळ-भाजीपाला शेतकऱ्यांना बसत आहे. तालुक्यातील 11 शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेली वांगी फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. काबाडकष्ट करुन पिकवलेली वांगी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

वांग्याचे पिक अगदी जोमात आले. मात्र, लॉकडाऊनमुळे मार्केटमध्ये अनिश्चितता निर्माण झाली. त्यामुळे मालाला भाव मिळत नाही. तसेच शेतमाल बाजारात किंवा शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्यात अडचणी येत आहेत. वांगी तोडण्याची मजुरी, वाहतूक खर्च लक्षात घेता. हाती काहीच येत नसल्याने आत्तापर्यंत झालेला खर्च माथी मारून घेत या शेतकऱ्याने अखेर वांगी जनावरांना खायला दिली आणि उकिरड्यावर फेकून दिली आहेत.

जांभळ्या वांग्याला गुजरात बरोबरच जळगाव, भूसावळ व धुळ्याकडे अधिक मागणी आहे. लग्न समारंभात या वांग्याचे भरीत खास पदार्थ म्हणून बनवला जातो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद आणि व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्याला हे नुकसान सहन करावे लागत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here